TRENDING:

आजचं हवामान: विदर्भावर आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Last Updated:
आजचं हवामान: विदर्भातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. आज पुन्हा वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट आहे.
advertisement
1/7
आजचं हवामान: विदर्भावर आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाच आस्मानी संकट घोंघावत आहे. विदर्भात देखील उष्णता वाढली असून काही जिल्ह्यांना अवकाळी पाऊस झोडपणार आहे.
advertisement
2/7
विदर्भातील 8 जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता असून हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुढील 24 तांसातील विदर्भातील हवामान आणि तापमान स्थितीबाबत जाणून घेऊ.
advertisement
3/7
आज विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, यवतमाळ, भंडारा आणि गडचिरोली या 8 जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
4/7
अमरावतीत आज सर्वाधिक 43 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, येथील हवामानात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज इशारा देण्यात आला आहे. नागपूरमध्ये किमान तापमान 25 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 41 अंशांवर असून, जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे.
advertisement
5/7
वर्धा आणि चंद्रपूरमध्येही असेच वातावरण असून, चंद्रपूरमध्ये किमान तापमान अवघं 17 अंश इतकं खाली घसरलं आहे. गोंदियात 24 अंश सेल्सिअस किमान आणि 38 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. बुलढाणा व अकोला या भागांमध्ये सध्या अंशतः ढगाळ वातावरण असणार आहे.
advertisement
6/7
या हवामानाच्या बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. आकाशात विजा चमकत असताना उघड्या जागांमध्ये जाणं टाळावं. विजेपासून सुरक्षित अंतर ठेवावं आणि हवामान खात्याच्या सूचनांकडे लक्ष ठेवावं, असे प्रशासनाचं आवाहन आहे.
advertisement
7/7
शेतकऱ्यांनीही पिकांचे नुकसान टाळण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, कारण अचानक आलेल्या वाऱ्यांमुळे आणि पावसामुळे काही ठिकाणी शेतीचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
आजचं हवामान: विदर्भावर आस्मानी संकट, 24 तास धोक्याचे, 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल