TRENDING:

Nagpur Weather: विदर्भात पुन्हा आस्मानी संकट, गारपिटीने वाढला धोका, नागपूरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Vidarbha Weather: विदर्भातील हवामाना मे महिन्याच्या सुरुवातालीचा मोठे बदल जाणवत आहे. पुढील 24 तासांसाठी नागपूरसह 8 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5
विदर्भात पुन्हा आस्मानी संकट, गारपिटीने वाढला धोका, नागपूरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट
विदर्भातील अनेक भागांत सोमवारी रात्री गारपीट झाली. तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच आज पुन्हा विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने आज नागपूरसह आठ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.
advertisement
2/5
आज, मंगळवारी विदर्भात पावसासोबत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे. नागपूर, अमरावती, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर या भागांमध्ये हवामान अस्थिर राहण्याची शक्यता आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. अकोला आणि बुलढाणा परिसरात दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
advertisement
3/5
नागपूर, वर्धा, बुलढाणा, गोंदिया या जिल्ह्यांतील कमाल तापमान 38 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. तर अमरावती, अकोला, चंद्रपूर या जिल्ह्यांतील कमाल तापमान 40 ते 41 अंश सेल्सिअस दरम्यान असू शकतं.
advertisement
4/5
पुढील 24 तासांसाठी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस असल्यानं नागरिकांनी सुद्धा स्वतःची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. विजांचा कडकडाट होत असताना बाहेर पडणे टाळावे. तसेच बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
advertisement
5/5
शेतकऱ्यांनी हवामानातील या बदलाची गंभीर दखल घेत आपल्या पिकांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच वादळी वाऱ्यांमुळे येणाऱ्या आपत्ती पासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur Weather: विदर्भात पुन्हा आस्मानी संकट, गारपिटीने वाढला धोका, नागपूरसह 8 जिल्ह्यांना अलर्ट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल