मला वाटतंय की टीम इंडियामध्ये...
अजिंक्य रहाणेने आधीच म्हटलं होतं की, मला वाटतंय की टीम इंडियामध्ये दोन बदल केले जातील. गंभीर नक्की अक्षर पटेल आणि एका फास्टर बॉलरला खाली बसवेल आणि एका खेळाडूची टीम इंडियामध्ये एन्ट्री होईल. नंबर आठ वर बॅटर हवा असल्याने हर्षित राणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेतील. तसेच कुलदीप यादवला देखील संधी दिली जाईल, असं अजिंक्यने प्रेडिक्ट केलं होतं, असं अँकरने प्रेक्षकांना सांगितलं. त्यावर अजिंक्य रहाणे याने एका वाक्यात उत्तर दिलं.
advertisement
हर्षितला संधी दिली जाईल अन्...
असंच मी कॅप्टन झालो नाही, असं अजिंक्य रहाणे आत्मविश्वासाने म्हणाला. त्यानंतर रहाणेचं उत्तर ऐकून सर्वांना धक्का बसला अन् सर्वजण हसले. अजिंक्य रहाणे याने दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यापूर्वी भविष्यवाणी केली होती की, हर्षितला संधी दिली जाईल अन् दोन खेळाडू बाहेर असतील. ती भविष्यवाणी हुबेहुब खरी ठरली. पीचचा अंदाज घेत अजिंक्य रहाणे याने हा अंदाज वर्तविला होता. रहाणेच्या या भविष्यवाणीमुळे गंभीरचा प्लॅन आधीच लीक होतोय की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह/ हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.
