Nashik Famous Misal Pav: झणझणीत, तर्रीदार अन् टेस्टी... नाशिककर 'या' 6 मिसळ कधीही चुकवू नका!
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
नाशिककरांच्या आवडीचा नाष्टा म्हणजे मिसळ पाव. अनेक जण नाशिकमधल्या फेमस मिसळवर ताव मारतात. जर तुमचा नाशिकमध्ये मिसळ खाण्याचा प्लॅन असेल तर, 'या' दुकानांमध्ये तुम्ही नक्की मिसळ खायचा प्लॅन करा.
advertisement
1/7

नाशिक जिल्हा फक्त धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टीने प्रसिद्ध असून फूडी लव्हर्ससाठी ही खास आहे. जर तुम्ही नाशिककर असाल तर आवर्जुन नाशिकमधील फेमस मिसळ नक्की ट्राय करा.
advertisement
2/7
साधना चुलीवरची मिसळ- ही मिसळ खाण्यासाठी फक्त नाशिककरच नाही तर, मुंबईसह आजूबाजूच्याही शहरातले माणसं येत असतात. या नाशिकमधील ही फेमस मिसळ गंगापूर- सातपूर लिंक रोडवर आहे.
advertisement
3/7
विठ्ठला मिसळ- नाशिकमधील फेमस मिसळपैकी ही एक मिसळ आहे. या मिसळची चव चाखण्यासाठी अनेक जण नाशिकमध्ये आल्यानंतर आवर्जुन या हॉटेलला भेट देतात.
advertisement
4/7
पेरूची वाडी चुलीवरची मिसळ- नाशिक मधलं फेमस मिसळ खाण्यासाठीचं हे ठिकाण आहे. फक्त नाशिक मधूनच नाही तर मुंबईसह वेगवेगळ्या ठिकाणावरून फूड लव्हर इकडे येत असतात. हे हॉटेल मखमलाबाद- गिरणारे हायवेवर आहे. तुम्ही इथे नक्कीच तुमच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी येऊ शकता.
advertisement
5/7
अंबिका मिसळ- नाशिकमध्ये फार जुन्या असलेल्या मिसळपैकी एक प्रसिद्ध दुकान आहे. या मिसळचा आस्वा घेण्यासाठी तुम्हाला रविवार कारंजा याठिकाणी जावं लागेल. झणझणीत आणि तर्रीदार मिसळ खाण्यासाठी नाशिकसह मुंबईमधूनही खवय्ये येत असतात.
advertisement
6/7
ग्रेप ॲम्बेसी अँड झटका मिसळ- झणझणीत आणि तर्रीदार मिसळ खाताना तुम्हाला इथे स्वीट सुद्धा दिलं जातं. इथली टेस्ट आणि आजूबाजूची हिरवळ पाहण्यासाठी खवय्ये आवश्यक येतात. इथली हटके पद्धतीची आसन व्यवस्था खवय्यांच्या पसंदीस पडत आहे. हे ठिकाण मखमलाबाद गावाजवळ आहे.
advertisement
7/7
शामसुंदर मिसळ- नाशिकच्या फेमस मिसळ दुकानांमध्ये शामसुंदर मिसळचाही समावेश होतो. झणझणीत, तर्रीदार आणि टेस्टी मिसळ खाण्यासाठी नाशिककर आवर्जुन हजेरी लावतातच. नाशिकच्या सातपुर कॉलनीमधील एमआयडीसी एरियामध्ये ही मिसळ आहे. या मिसळची कायमच नाशिककरांमध्ये चर्चा होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Famous Misal Pav: झणझणीत, तर्रीदार अन् टेस्टी... नाशिककर 'या' 6 मिसळ कधीही चुकवू नका!