TRENDING:

बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार, धडकी भरवणारी गर्दी; ड्रोनशूटचे फोटो पाहून उंचावतील भुवया

Last Updated:
ओबीसी मेळाव्याला मोठी गर्दी जमली असून या गर्दीचे ड्रोनशूटमधील फोटो समोर आले आहेत.
advertisement
1/9
बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार, धडकी भरवणारी गर्दी
आता गप्प बसणार नाही, ओबीसी आरक्षणासाठी कोर्ट आणि रस्त्यावर दुहेरी लढा लढू असा इशारा छगन भुजबळांनी दिला. राज्यभरातून ओबीसी समाज बांधव मेळाव्यासाठी जमले होते.
advertisement
2/9
मराठा आरक्षणासंदर्भातल्या जीआरच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या ओबीसींचा महाएल्गार मेळावा बीडमध्ये पार पडला. मैदान मेळव्यासाठी आलेल्या गर्दीने फुलून गेलं होते
advertisement
3/9
छगन भुजबळ, धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके, गोपिचंद पडळकर यांच्यासह अनेक ओबीसी नेते यावेळी उपस्थित होते. आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना भुजबळांनी नाव न घेता जरांगेंवर प्रहार केला.
advertisement
4/9
दरिंदे पाटलामुळे मराठा समाज आणि आमच्यात अंतर निर्माण झाल्याची टीका भुजबळांनी केली... तर ओबीसींचं आरक्षण हिसकावून द्यायचं नाही असं आवाहन धनंजय मुंडेंनी ओबीसी बांधवांना केलं.
advertisement
5/9
ओबीसी मेळाव्याला मोठी गर्दी जमली असून या गर्दीचे ड्रोनशूटमधील फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये मैदान तुडूंब भरलं असून लांबच्या लांब माणसांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे.
advertisement
6/9
मराठा समाज आणि आमच्या अंतर पडले ते अंतर अंतरवलीच्या दरीद्री पाटलामुळे पडले आहे, असे म्हणत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली.
advertisement
7/9
ओबीसी बांधवांनी केलेली गर्दी या मेळाव्याची ताकद दाखवणारी आहे
advertisement
8/9
आरक्षण सामाजिक दृष्ट्या मागासलेल्यांसाठी आहे. तो गरिबी हटावचा कार्यक्रम नाही असे भुजबळ म्हणाले. यावेळी बोलताना भुजबळ यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर देखील टीका केली. विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला. गेला तर गेला पण जीआर काढला अशी टीका भुजबळ यांनी केली.
advertisement
9/9
विखे पाटील कारण नसताना जरांगेकडे जातात. भाजपच्या लोकांना मला सांगायचे की तुमच्या लोकांना आवरा असेही भुजबळ म्हणाले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
बीडमध्ये ओबीसींचा महाएल्गार, धडकी भरवणारी गर्दी; ड्रोनशूटचे फोटो पाहून उंचावतील भुवया
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल