बंपर दूध उत्पादनासाठी गायीच्या 'या' 5 प्रजाती सर्वोत्तम! रोज मिळू शकतं 40 लिटर दूध
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
शेतीपूरक व्यवसायांमधून आता शेतकरी बांधव उत्तम कमाई करू लागले आहेत. दूग्धपालन हादेखील त्यापैकी एक महत्त्वाचा व्यवसाय. या व्यवसायात यश मिळवायचं असेल, यातून चांगलं आयुष्य जगायचं असेल तर नेमक्या कोणत्या प्रजातीच्या गायी पाळाव्या जाणून घेऊया. या गायींपासून दूध भरपूर मिळेल आणि खर्चही कमी होईल. (रजत भट्ट, प्रतिनिधी)
advertisement
1/5

साहिवाल ही गायीची अत्यंत खास प्रजाती मानली जाते. या प्रजातीच्या गायी भरपूर दूध देतात. त्यामुळे या गायींच्या पालनातून शेतकरी बांधव चांगलं उत्पन्न मिळवू शकतात. या गायीपासून दररोज 10 ते 20 लिटर दूध मिळू शकतं. व्यवस्थित देखभाल केल्यास हे प्रमाण 30 ते 40 लिटरवरही जाऊ शकतं.
advertisement
2/5
गीर प्रजातीच्या गायी आकाराने मोठ्या असतात. त्या दररोज 12 ते 20 लिटर दूध देतात. त्यांचं वजन 400 ते 500 किलोग्रॅम एवढं असतं. बाजारात या गायीची 50 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत किंमत आहे.
advertisement
3/5
लाल कंधारी गाय लहान शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. या गायीच्या देखभालीसाठी जास्त खर्च करावा लागत नाही, कारण तिला जास्त चाऱ्याची गरज भासत नाही. पशूरोग अधिकारी शिवकुमार वर्मा सांगतात की, ही गाय दिवसाला 4 ते 5 लिटर दूध देते.
advertisement
4/5
थारपारकर ही गायीची एक खास प्रजाती मानली जाते. या गायीपासून सर्वोत्तम दूध मिळतं असं म्हणतात. ही गाय दररोज 12 ते 16 लिटर दूध देते. या गायीचं वजन असतं साधारण 250 ते 300 किलोग्रॅम आणि किंमत असते साधारण 50 ते 60 हजार रुपये.
advertisement
5/5
राठी प्रजातीच्या गायी कोणत्याही वातावरणात आणि कोणत्याही भागात <a href="https://news18marathi.com/money/agriculture/kadaknath-chicken-egg-is-also-cheap-than-this-hen-1-egg-price-is-100-rupees-know-in-detail-mhkd-1196643.html">निरोगी</a> राहतात. शिवकुमार वर्मा सांगतात की, ही गाय कोणत्याही वातावरणाशी जुळवून घेते, हेच अत्यंत <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/these-special-chutneys-will-make-your-meal-delicious-l18w-mhij-1196040.html">फायदेशीर</a> ठरतं. ही गाय दररोज 7 ते 12 लिटर दूध देते. व्यवस्थित <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/can-tomatoes-help-reduce-weight-mhij-1195902.html">देखभाल</a> हे प्रमाण 18 ते 20 लिटरवरही जाऊ शकतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
बंपर दूध उत्पादनासाठी गायीच्या 'या' 5 प्रजाती सर्वोत्तम! रोज मिळू शकतं 40 लिटर दूध