मोसंबी शेतीतून वर्षाला 20 लाखांचा नफा, शेतकऱ्याने कसं कमावलं? PHOTOS
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
पारंपरिक शेतीला फाटा देत मोसंबीची लागवड केली. बीडमधील शेतकऱ्याला वर्षाकाठी 20 लाखांचा नफा झाला.
advertisement
1/9

सध्याच्या काळात पारंपरिक शेतीला फाटा देत अनेक शेतकरी आधुनिक शेतीकडे वळले आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अनेकजण आपल्या शेतात विविध प्रयोग करत आहेत. त्यामुळे शेतीतून चांगले उत्पन्न मिळत आहे.
advertisement
2/9
मराठवाड्यात मोसंबीच्या शेतीसाठी अनुकूल हवामान आहे. हेच ओळखून <a href="https://news18marathi.com/maharashtra/beed/">बीड जिल्ह्यातील</a> शिरसमार्गचे शेतकरी संभाजी पवळ यांनी आपल्या शेतात मोसंबीची बाग लावली. आता या मोसंबीच्या शेतीतून ते वर्षाला 20 लाखांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.
advertisement
3/9
मराठवाड्यात शेतीसाठी पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उपलब्ध पाण्यावर फळबागांच्या शेतीकडे वळत आहेत. हवामान अनुकूल असल्याने अनेकांचा कल मोसंबीच्या शेतीकडे असतो.
advertisement
4/9
बीड तालुक्यातील शिरसमार्ग हे 4 हजार लोकवस्तीचे गाव आहे. येथील शेतकरी संभाजी पवळ यांना 40 एकर शेती आहे.
advertisement
5/9
पारंपरिक शेती करताना खर्च वजा जाता हातात काहीच उरत नव्हते. त्यासाठी पवळ यांनी मोसंबी शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
advertisement
6/9
2002 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी 4 एकर क्षेत्रावर मोसंबीची लागवड केली. या चार एकर क्षेत्रामधून अधिक उत्पन्न त्यांच्या हातात येऊ लागलं. त्यानंतर पवळ यांनी आणखी काही क्षेत्रावर मोसंबीची लावगड करण्याचं ठरवलं.
advertisement
7/9
2011 साली त्यांनी 16 एकर क्षेत्रावर 16×16 या लागवड पद्धतीने जवळपास 2500 न्यू शेंलार या मोसंबी जातीच्या रोपांची लागवड केली. जवळपास या मोसंबीच्या प्रति एकरी लागवड आणि मशागतीसाठी 50 हजार रुपये इतका खर्च आला.
advertisement
8/9
संभाजी पवळ यांना मोसंबीच्या शेतीतून चांगला नफा मिळत आहे. गतीवर्षी मोसंबीची तोडणी झाली. जवळपास 2500 झाडातून पवळ यांना 120 टन मोसंबी निघाली. यामधून त्यांना 32 लाख रुपये एवढे उत्पन्न मिळाले.
advertisement
9/9
लागवड खर्च वजा जाता त्यांच्या हाती वीस लाख रुपये निव्वळ नफा आला. यंदा देखील मोसंबी तोडणीला आता सुरुवात झाली असून खर्च वजा जाता 15 ते 20 लाख रुपये नफा मिळेल अशी अपेक्षा आहे, असे पवळ यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
मोसंबी शेतीतून वर्षाला 20 लाखांचा नफा, शेतकऱ्याने कसं कमावलं? PHOTOS