TRENDING:

Goat Farming Tips : या 5 प्रकारच्या शेळ्या करतील मालामाल, नेमकं काय कराल?

Last Updated:
Goat Farming Tips : शेळीपालन हा कमी खर्चात जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. मात्र, जेव्हा तुम्ही चांगल्या दर्जाच्या शेळीचे पालन कराल तेव्हा तुम्हाला त्यापेक्षा जास्त नफा होणार. या शेळ्या नेमक्या कोणत्या आहेत, तेच आपण आज जाणून घेऊयात. (सौरभ वर्मा/रायबरेली, प्रतिनिधी)
advertisement
1/5
Goat Farming Tips : या 5 प्रकारच्या शेळ्या करतील मालामाल, नेमकं काय कराल?
रायबरेली येथील पशुतज्ञ डॉ. इंद्रजीत वर्मा सांगतात की, शेळीपालन करणाऱ्यांनी सानेन, बीटल, सिरोही, जमुनापरी, जाखराणा या पाच जातीच्या शेळ्यांचे पालन जर केले तर ते यातून चांगला नफा कमावू शकतात. या शेळ्या चांगल्या दर्जाचे मांस आणि चांगल्या दुधासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या दुधाला आणि मांसाला बाजारात जास्त मागणी आहे. म्हणून त्यांना चांगला नफा मिळतो, असे ते म्हणाले. सानेन जातीच्या शेळीच्या मांसाला आणि दुधाला बाजारात विशेष मागणी आहे. त्यामुळे मी खर्चात या जातीच्या शेळीचे पालन करुन शेतकरी चांगला नफा कमावू शकतात. ही शेळी दिवसाला तीन ते चार लीटर दूध देते. या शेळीचे दूध हे उच्च गुणवत्तापूर्ण असते.
advertisement
2/5
राजस्थानमध्ये पाळली जाणारी सिरोही जातीची शेळी दूध आणि मांस दोन्हीसाठी ओळखली जाते. सिरोही जातीच्या शेळ्यांमध्ये उच्च गुणवत्तायुक्त मांस उत्पादन, दुग्ध उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. कोणत्याही वातावरणात या शेळ्या राहतात. सिरोही जातीच्या शेळीचा रंग भूरा, सफेद असतो. ही शेळी एका वर्षात दोन वेळा पिल्लांना जन्म देते. तसेच प्रत्येक दिवशी एक ते दोन लीटर दूध देते.
advertisement
3/5
बीटल जातीची शेळीही महत्त्वाच मानली जाते. यामध्ये जास्त प्रमाणात दूध उत्पादनाची क्षमता असते. उच्च दर्जाचे दूध आणि मांस यासाठी ही शेळी ओळखली जाते. या शेळीच्या चामड्यालाही मोठी मागणी आहे. ही शेळी पंजाब आणि हरियाणा राज्यात आढळते. तसेच पंजाबच्या अमृतसर, गुरदासपुर आणि फिरोजपुर जिल्ह्यात आढळते. त्यामुळे या शेळीला अमृतसरी बकरी या नावानेही ओळखले जाते. प्रतिदिन ही शेळी 2 ते 3 लीटर दूध देते. तसेच स्तनपाना दरम्यान, 1.5 ते 1.9 लीटर पर्यंत दूध देते. ही शेळी चारा खाणे जास्त पसंत करते. ही शेळी 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत विकली जाते.
advertisement
4/5
जमुनापारी हिला "बागर" या नावानेही ओळखले जाते. ही शेळी उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात आढळते. जमुनापारीचा रंग सफेद असते. या शेळीच्या पाठीवर आणि शरीरावर मोठे केस आणि शिंगे लहान असतात. या शेळीचे कान मोठे असतात. या शेळीची उंची आणि लांबी इतरांच्या तुलनेत जास्त असते. या शेळीचे वजन इतरांच्या तुलनेत जास्त असते. संपूर्ण आयुष्यात ही शेळी 12 ते 14 पिलांना जन्म देते. ही शेळी दिवसा सरासरी 1.5 ते 2 लीटर दूध देते.
advertisement
5/5
शेळींमधील जखराणा ही एक खास जात आहे. यामध्ये तीन गुण एकाच वेळी आढळतात. या जातीच्या शेळ्या त्यांच्या उच्च दर्जाचे दूध आणि मांस साठी ओळखल्या जातात. तसेच तिची प्रजनन क्षमताही जास्त आहे. ही शेळी दररोज दीड ते दोन लिटर दूध देते, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
Goat Farming Tips : या 5 प्रकारच्या शेळ्या करतील मालामाल, नेमकं काय कराल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल