TRENDING:

पांढऱ्या स्ट्रॉबेरीला मिळतोय तिप्पट दर, पण शेतीसाठी घ्यावी लागणार या शेतकऱ्याची परवानगी

Last Updated:
भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल तर त्यासाठी खामकर यांची परवानगी लागणार आहे.
advertisement
1/7
पांढऱ्या स्ट्रॉबेरीला मिळतोय तिप्पट दर, शेतीसाठी लागणार या शेतकऱ्याची परवानगी
स्ट्रॉबेरी म्हटलं की रंगाने लाल आणि चवीने थोडी आंबट हे आपल्याला माहिती आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर, भीलार, वाई भागात याचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जाते.
advertisement
2/7
पण <a href="https://news18marathi.com/maharashtra/satara/">साताऱ्यातील</a> वाई फुलेनगर येथील प्रयोगशील शेतकरी उमेश खामकर यांनी अर्ध्या एकरामध्ये चक्क पांढऱ्या स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. विशेष म्हणजे पांढरी स्ट्रॉबेरी विकायला सुरुवात देखील केली आहे.
advertisement
3/7
शेतीत एक वेगळा प्रयोग करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सध्या काही ठिकाणीच त्यांनी ही फळे विक्रीसाठी ठेवली आहेत.
advertisement
4/7
लवकरच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही ही विक्री होणार आहे. विशेष म्हणजे अडीचशे रुपये किलोने सामान्य स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घेण्यापेक्षा या पांढरी स्ट्रॉबेरीला 1 हजार ते 1500 रुपये किलो भाव मिळतो आहे.
advertisement
5/7
हा देशातील पहिला प्रयोग असून फ्लोरिडा पर्ल जातीच्या स्ट्रॉबेरीचे पीक पहिल्यांदा अमेरिका आणि युकेमध्ये घेण्यात आले. याला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला.
advertisement
6/7
त्यामुळे पुढे वेगवेगळ्या भागांमध्ये याचे उत्पन्न घ्यायला सुरुवात झाली. भारतात मात्र हा प्रयोग करण्यासाठी पहिला प्रयत्न उमेश खामकर यांनी केला. यासाठी फ्लोरिडा विद्यापीठाची रॉयल्टी राइट्स त्यांनी विकत घेतले.
advertisement
7/7
भारतात कुठेही या स्ट्रॉबेरीचे उत्पन्न घ्यायचे असेल तर त्यासाठी खामकर यांची परवानगी लागणार आहे. (शुभम बोकडे, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/कृषी/
पांढऱ्या स्ट्रॉबेरीला मिळतोय तिप्पट दर, पण शेतीसाठी घ्यावी लागणार या शेतकऱ्याची परवानगी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल