भरघोस उत्पन्न देणारी तूर शेती संकटात, पाहा काय कारण? PHOTOS
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
भरघोस उत्पन्न देणारं तुरीचं पीक संकटात सापडलं आहे.
advertisement
1/5

यंदा मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून भरघोस उत्पन्न देणारं तुरीचं पीक संकटात सापडलं आहे.
advertisement
2/5
त्यामुळे तूर उत्पादक शेतकरीही अडचणीत आला आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळातील तूर पिकालाही या दुष्काळी स्थितीचा फटका बसला असून उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.
advertisement
3/5
धाराशिव जिल्ह्यात तुरीचे पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे या कालावधीत तूर पिकाला पाण्याची अत्यंत गरज भासते. परंतु जिल्ह्यातील तलाव आणि विहिरींमध्ये पाणी नसल्याने तूर पिकाला पाणी देता येत नाही. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट निर्माण झाली आहे.
advertisement
4/5
अगदी खरीप हंगामात पाऊस अत्यंत कमी प्रमाणात पडल्याने विहिरी नद्या कोरड्या ठाक आहेत. त्यातच तूर पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. पिकाला पाण्याची गरज भासत असून पाणी उपलब्ध नसल्याने तूर पिकाच्या कळ्यांची गळती होत आहे.
advertisement
5/5
सध्या तुरीला 10 हजार ते 11 हजार रुपयांपर्यंतचा प्रती क्विंटल बाजार भाव मिळतोय. तर एकीकडे तुरीच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्चही निघतो का? अशी अवस्था दुष्काळामुळे झाली आहे, असे मत तूर उत्पादक नारायण साबळे यांनी व्यक्त केले.