Bank Holiday Update: उद्यापासून सलग 5 दिवस बँक राहणार बंद, RBI ने जाहीर केली हॉलिडे लिस्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
होळी आणि विकेंडमुळे RBI सुट्ट्यांमुळे ५ दिवस बँका बंद राहू शकतात. ATM सेवा सुरू पण कॅश संपण्याची शक्यता. UPI व्यवहार सुरळीत, चेक क्लिअरन्ससाठी प्रतीक्षा आवश्यक.
advertisement
1/6

तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कायम धावपळीत असणाऱ्या आपल्या आयुष्यात बँकेची कामं आपण अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत ढकलतो.
advertisement
2/6
जर तुमचं असं काही काम अडकलं असेल, तर आता उशीर करू नका. कारण उद्यापासून बँकांवर 'होळी' आणि 'विकेंड'चा असा काही रंग चढणार आहे की, सलग ५ दिवस बँकांचे दरवाजे तुमच्यासाठी बंद राहू शकतात.
advertisement
3/6
होळीनिमित्ताने पुन्हा एकदा RBI सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. शनिवार आणि रविवार शेवटचा असल्याने दोन दिवस बँक बंद राहातील. २ मार्च होलिका दहन असल्याने काही ठराविक राज्यांत बँका बंद राहतील.
advertisement
4/6
३ मार्च धुलिवंदन आणि डोल जत्रा निमित्त मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांत बँकांचे कामकाज होणार नाही. ४ मार्च होळीचा मुख्य सण असल्याने देशाच्या बहुतांश भागात बँकांना सुट्टी असेल.होळीच्या सणामुळे घराघरांत आनंदाचं वातावरण असणार आहे, सलग सुट्ट्यांमुळे ATM मध्ये खडखडाट जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
5/6
खिशात ऐनवेळी पैसे नसतील तर अडचणीत सापडू शकता. बँका बंद असल्या तरी ATM सेवा सुरू राहील, पण सलग सुट्ट्यांच्या काळात अनेकदा एटीएममधील कॅश संपण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे शक्य असल्यास आजच आवश्यक तितके पैसे काढून ठेवा.
advertisement
6/6
या कालावधीमध्ये UPI सेवा सुरळीत सुरू राहतील. त्यामुळे पैसे पाठवण्याचे व्यवहार तुम्ही करू शकता. फक्त चेक क्लिअरन्स किंवा बँकेत प्रत्यक्ष जाऊन करायची कामं असतील, तर मात्र तुम्हाला ४ मार्चपर्यंत वाट पाहावी लागेल. प्रत्येक शहरात स्थानिक सणानुसार सुट्ट्यांमध्ये बदल असू शकतो. त्यामुळे आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन किती दिवस आणि कशी सुट्टी असणार याची माहिती करून घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Bank Holiday Update: उद्यापासून सलग 5 दिवस बँक राहणार बंद, RBI ने जाहीर केली हॉलिडे लिस्ट