AC खरेदी करताना 'या' गोष्टी विचारात घ्या, पैसे फुल्ल वसूल होतील!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Air Conditioner Buying Tips: उन्हाळा येताच AC आणि Coolerची मागणी वाढते. सध्या तर उकाडा प्रचंड वाढलाय. तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यात एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. एसी खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या हे आज आपण जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही, झाला तर फायदाच होईल. (रिया, प्रतिनिधी / दक्षिण दिल्ली)
advertisement
1/5

आजकाल मार्केटमध्ये वेगवेगळे एसी मिळतात. जसं की, विंडो AC, स्प्लिट AC, पोर्टेबल AC, टॉवर AC, इत्यादी. त्यात विंडो AC आणि स्प्लिट <a href="https://news18marathi.com/photogallery/technology/place-this-rs-391-machine-near-the-electricity-meter-light-bill-will-reduce-even-in-summer-gh-mhss-1160573.html">ACला विशेष मागणी</a> असते. हिल्टन एंटरप्राइजचे मॅनेजर अशोक यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
2/5
अशोक यांनी सांगितलं की, AC खरेदी करताना स्टार रेटिंगवर लक्ष द्या. त्यावरून त्या एसीची एफिशियंसी दिसते. कारण त्याचा थेट संबंध वीजेशी असतो. म्हणजेच एसीला जेवढं जास्त स्टार रेटिंग असतं, त्याद्वारे तेवढीच कमी वीज वापरली जाते.
advertisement
3/5
एसी खरेदी करण्यापूर्वी आपल्या खोलीची जागाही विचारात घ्यावी. जर खोली लहान असेल तर <a href="https://news18marathi.com/photogallery/technology/how-much-electricity-is-used-by-1-ton-package-ac-you-should-know-mhmv-1160930.html">तुम्ही 1 टनचा एसी खरेदी करू शकता</a>. हॉलमध्ये एसी लावायचा असेल तर दीड ते 2 टनचा एसी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
advertisement
4/5
मार्केटमध्ये इनव्हर्टर आणि नॉन इनव्हर्टर अशा दोन प्रकारचे एसी मिळतात. इनव्हर्टर एसीमध्ये व्हेरिएबल स्पीड कंप्रेसर असतं. जे तापमान कंट्रोल करून आपल्या हिशोबाने खोलीत गारवा निर्माण करतं. तर, नॉन इनव्हर्टर एसीमध्ये फिक्सिड स्पीड कंप्रेसर असतं. जे गरजेनुसार सुरू आणि बंद होतं. दरम्यान, नॉन इनव्हर्टरच्या तुलनेत इनव्हर्टर एसीमुळे वीजेची जास्त बचत होते.
advertisement
5/5
कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना सर्वात आधी ब्रँड लक्षात घ्यावा. त्या सामानाची गॅरंटी मिळायला हवी. त्यामुळे नामवंत ब्रँडच्याच वस्तू खरेदी कराव्या. किंमतीबाबत बोलायचं झाल्यास एसीची किंमत साधारण 27000 रुपयांपासून सुरू होते. 50 हजार रुपयांपर्यंत चांगल्या क्वालिटीचा एसी मिळतो.