पेट्रोल पंपावर गर्दी वाढली, देशावर मोठं तेल संकट येणार? सरकारी कंपनीने स्पष्टच सांगितलं
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Petrol-Diesel Update : आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी गॅस कनेक्शन तुटवड्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चा पेट्रोल-डिझेलच्या बाबतीतही सुरू झाल्या आहेत. पेट्रोल पंपार प्रचंड गर्दी वाढलीये.
advertisement
1/7

नवी दिल्ली : एलपीजी गॅस कनेक्शनचा तुटवडा होणार असं म्हणत लोकं काही दिवसांपासून एलपीजी कनेक्शन घेण्यासाठी गर्दी करत होते. आता पेट्रोल आणि डिझेल पुरवठ्यावरही संकट येणार आहे का? देशभरातील काही पेट्रोल पंपावर अचानक गर्दी वाढली. ज्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होणार का? अशा चर्चा रंगायला लागल्या आहेत. सर्वसामान्यांमध्ये भितीचं वातावरण आहे.
advertisement
2/7
खरंच देशात पेट्रोलचा तुटवडा जाणवणार आहे का? हे सांगण्यासाठी आता भारतातील तेल कंपन्यांना समोर यावं लागलंय. भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडने बुधवारी म्हटलं की, देशात पेट्रोल आणि डिझेलची कोणतीही कमतरता येणार नाही.
advertisement
3/7
कंपनीने म्हटलं की, लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसंच पूर्ण देशात इंधनाचा पुरवठा अगदी योग्य सुरू आहे. कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधनाची कमतरता नाही.
advertisement
4/7
बीपीसीएलने सर्वसामान्यांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनेत सांगितलंय की, देशात पूर्ण क्षमतेसह तेलाचं उत्पादन आणि सप्लाय सुरू आहे. हे यापुढेही चालू ठेवण्यासाठी आम्ही येथे कटिबद्ध आहोत. कंपनीने म्हटलं की, देशात इंधन कमतरतेच्या ज्या अफवा पसरवल्या जात आहेत. त्या पूर्णपणे निराधार आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका.
advertisement
5/7
कंपनीने दावा केलाय की, भारत सध्या पेट्रोल आणि डिझेलचा निव्वळ निर्यातदार देश आहे. ज्यावरुन स्पष्ट होतं की, देशात क्रूडसह पेट्रोल आणि डिझेल आणि हवाई ईंधन पुरेसं आहे. यामुळेच याचा तुटवडा निर्माण होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.
advertisement
6/7
सोशल मीडियावर जारी केला मेसेज : बीपीसीएलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर म्हणजेच एक्सवर पोस्टमध्ये लिहिलेय की, देशात सप्लाय चेन अगदी व्यवस्थित काम करतेय. यात कोणतीही बाधा आलेली नाही.देशातील सर्व राज्य आणि प्रत्येक भागात तेल उपलब्ध आहे. ज्यामुळे पेट्रोल पंपावरही ग्राहकांना सहज इंधन मिळतंय.
advertisement
7/7
कंपनी नागरिकांना सल्ला देते की, घाबरुन जाऊ नका. यासोबतच अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करू नका. देशात सध्या इंधनाचा तुटवडा नाही यासोबत भविष्यातही अशी समस्या निर्माण होईल असं दिसत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
पेट्रोल पंपावर गर्दी वाढली, देशावर मोठं तेल संकट येणार? सरकारी कंपनीने स्पष्टच सांगितलं