एक एप्रिलपासून बदलतील RBI चे हे नियम! CIBIL स्कोअरसह नॉमिनीवर मोठी अपडेट
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Loan Rule Change from April 1 : येत्या एक एप्रिलपासून म्हणजेच उद्यापासून नवं आर्थिक वर्ष सुरू होतंय. ज्यामुळे या दिवसापासून अनेक महत्वाचे नियम बदलणार आहेत. सिबिल स्कोअरचाही एक नियम बदलतोय. ज्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/7

नवी दिल्ली : नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या दिवसापासून सरकारकडून काही महत्त्वाच्या आर्थिक नियमांत बदल होणार आहेत. यामध्ये सिबिल स्कोअरच्या नियमाचाही समावेश आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील बँकिंग आणि लोन सेक्टरमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी काही बदलांची घोषणा केलीये. हे बदल 1 एप्रिल 2026 पासून लागू होतील.
advertisement
2/7
या बदलांमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण बदल हा तुमच्या क्रेडिट स्कोअर अपडेट होण्याची प्रोसेस आणि लोन वेळेपूर्वी बंद करण्याच्या शुल्काविषयी आहे. या नियमामध्ये पर्सनल फायनेंस सोपे होईल, यासोबतच बँक आणि ग्राहकांमध्ये विश्वासही मजबूत होईल.
advertisement
3/7
एक एप्रिलपासून लोन घेणाऱ्यांना आपला क्रेडिट स्कोअर अपडेट होण्यासाठी महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. सध्या सिबिल स्कोअर महिन्यात एकदा अपडेट होतो. पुढील महिन्यात ही प्रोसेस प्रत्येक 7 दिवसात पूर्ण होईल.
advertisement
4/7
महिन्याची 7, 14, 21 आणि 28 तारखेला तुमची क्रेडिट प्रोफाइल डेटा अपडेट होईल. जे लोक आपला क्रेडिट स्कोअर सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासाठीही भारी संधी असेल. कारण त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम आता त्यांना लवकर दिसेल. खरंतर मिस्ड पेमेंट किंवा उशीराने केलेल्या पेमेंटची माहितीही तेवढ्याच वेगाने अपडेट होईल.
advertisement
5/7
लोन प्रीपेमेंट आणि फोरक्लोजर चार्जपासून मुक्ती : लोन वेळेपूर्वी फेडणाऱ्यांसाठीही चांगली बातमी आहे. नवीन नियमांअंतर्गत आता फ्लोटिंग रेटवरही होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि एज्युकेशन लोनवरही कोणत्याही प्रकारचा प्रीपेमेंट किंवा फोरक्लोजर चार्ज वसूल केला जाणार नाही.
advertisement
6/7
सध्याच्या नियमानुसार वेळेपूर्वी लोन फेडले तर तुम्हाला कोणतेही चार्ज द्यावे लागणार नाही. सध्या असा नियम आहे की, एखाद्या ग्राहकाने आपल्या बचतीचा वापर करुन लोन लवकर फेडले तर त्याला बँकेला काही चार्ज द्यावा लागतो.
advertisement
7/7
चार नॉमिनी जोडता येतील : एक एप्रिलपासून ग्राहक आपल्या बँक अकाउंट आणि लॉकरमध्ये जास्तीत जास्त चार नॉमिनी जोडू शकतील. ज्यामुळे बँक ग्राहकाचा अचानक मृत्यू झाल्यास, कायदेशीर वारसांपर्यंत सहज पोहोचता यावं. सोबतच ज्वेलरी व्यावसायिकांसाठी गोल्ड मेटल लोनची पेमेंट काळ 180 दिवसांनी वाढवून 270 दिवस केलाय. यामुळे त्यांच्या कॅश फ्लोमध्ये सुधारणा होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
एक एप्रिलपासून बदलतील RBI चे हे नियम! CIBIL स्कोअरसह नॉमिनीवर मोठी अपडेट