TRENDING:

Success Story: रोजंदार म्हणूनही कोणी देत नव्हतं काम, आता साबण निर्मितीने पालटलं नशीब, महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल

Last Updated:
वैष्णवी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ते निम साबण निर्मिती करत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना तब्बल 11 महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
advertisement
1/7
कोणी देत नव्हतं काम, साबण निर्मितीने पालटलं नशीब,महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल
इच्छा तिथे मार्ग अशी म्हण आपल्याकडे आहे. याच गोष्टीला सत्यात उतरवले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कवडगाव येथील ज्ञानेश्वर गव्हाड यांनी.
advertisement
2/7
वैष्णवी प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून ते निम साबण निर्मिती करत आहेत. या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना तब्बल 11 महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले आहे.
advertisement
3/7
कोरोना काळात हाताला काम राहिले नाही. रोजंदार म्हणून देखील कोणी काम देत नव्हते. घरी खाण्याची देखील आबाळ होऊ लागली.
advertisement
4/7
काय करावं या विचारात असताना एकाने निम पेस्ट तयार करण्याची कल्पना सांगितली. त्यानंतर बदनापूर इथे प्रशिक्षण घेऊन निम साबण निर्मितीचा गृह उद्योग सुरु केला.
advertisement
5/7
आता या व्यवसायाच्या माध्यमातून तब्बल 11 कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. मराठवाड्यातील 4 जिल्ह्यात कुरिअर द्वारे निम साबण पोहोच केली जाते.
advertisement
6/7
150 रूपयांना दोन अशी या साबणाची किंमत आहे. महिन्याला 1000 साबणांची विक्री होत असून 1 लाख रुपयांची उलाढाल तर 50 हजार रुपये निव्वळ नफा राहत असल्याचे ज्ञानेश्वर गव्हाड यांनी सांगितले.
advertisement
7/7
या साबण निर्मितीसाठी भोकर, निम पावडर, रीठा, पळस, पळस फुल पावडर, चिंचोका पावडर, आणि सुगंधी परफ्युम हे घटक वापरले जातात. सर्व नैसर्गिक घटक असल्याने या साबणाचे शून्य साईड इफेक्ट आहेत. अन् त्वचारोगावर ही साबण गुणकारी असल्याचे गव्हाड यांनी सांगितले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Success Story: रोजंदार म्हणूनही कोणी देत नव्हतं काम, आता साबण निर्मितीने पालटलं नशीब, महिन्याला 1 लाख रुपयांची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल