TRENDING:

ओटीपी न देता, लिंक न शेअर करता खात्यातून गायब झाले साडेचार लाख रुपये

Last Updated:
गोवंडीतील व्यापारी मोहम्मद अमरराज अन्वर कुरेशी यांच्या खात्यातून कोणतीही लिंक किंवा ओटीपी न देता साडेचार लाख रुपये गायब झाले, नेहरू नगर पोलिस तपास करत आहेत.
advertisement
1/6
ओटीपी न देता, लिंक न शेअर करता खात्यातून गायब झाले साडेचार लाख रुपये
ना कोणतीही लिंक, ना ओटीपी ना कोणताही फोन काहीही न करताही एका व्यापाऱ्याच्या खात्यातून साडेचार लाख रुपये उडवले आहेत. गोव्यातील एका व्यापाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल साडेचार लाख रुपये गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
advertisement
2/6
विशेष म्हणजे, या व्यापाऱ्याने ना कोणतीही लिंक शेअर केली होती, ना ओटीपी दिला होता. तरीदेखील त्यांचं खातं रिकामं झालं. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.गोवंडीतील शिवाजी नगर परिसरात राहणारे व्यापारी मोहम्मद अमरराज अन्वर कुरेशी १५ ऑगस्ट रोजी कामानिमित्त आपल्या मूळगावी गेले होते. त्यांचा मोबाईल त्या काळात बंदच होता.
advertisement
3/6
जवळपास महिन्यानंतर, २२ सप्टेंबर रोजी ते परत आले आणि मोबाईल सुरू करताच बँकेकडून आलेले मेसेज पाहून ते थक्क झाले. त्यांच्या खात्यातून पैसे डेबिट झाल्याचे त्यांना मेसेज येत होते.एकूण 5 लाख 6 हजार 580 रुपये त्यांच्या खात्यातून काढले होते. या प्रकरणानंतर कुरेशी यांनी तत्काळ बँकेशी संपर्क साधला. बँकेच्या ऑनलाइन आर्थिक फसवणूक नियंत्रण विभागात त्यांनी तक्रार दाखल केली.
advertisement
4/6
बँकेनेही चौकशी सुरू केली असल्याचे सांगण्यात आलं आहे. घटनेच्या वेळी कुरेशी पुन्हा कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार केली नव्हती. मात्र गोव्यातून परत आल्यानंतर त्यांनी घटनेचा तपशील गोळा केला आणि खात्यातील सर्व व्यवहार तपासले.
advertisement
5/6
तांत्रिक चौकशीतून त्यांनी पैशांची ट्रान्सफर कशी आणि कुठून झाली, याचा मागोवा घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसही या घटनेचा सखोल तपास करत असून ऑनलाइन फसवणुकीच्या नव्या पद्धतीकडे लक्ष वेधले जात आहे.
advertisement
6/6
प्रवासादरम्यान त्यांनी केलेले व्यवहार आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे पैसे किती डेबिट झाले आणि कशी फसवणूक झाली याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. नागरिकांना पोलिसांनी अलर्ट व्हायला सांगितलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
ओटीपी न देता, लिंक न शेअर करता खात्यातून गायब झाले साडेचार लाख रुपये
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल