TRENDING:

Gold Price: सोनं खरेदी करणं आता फक्त स्वप्न राहणार! ५००० रुपयांनी महागलं, २४ कॅरेटचा दर किती?

Last Updated:
Gold Price: ही दर वाढ अशीच कायम राहिल्यास सोनं खरेदी करणे हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
1/6
सोनं खरेदी करणं आता फक्त स्वप्न राहणार! ५००० रुपयांनी महागलं, २४ कॅरेटचा दर किती
सोन्याच्या बाजारात मागील काही दिवसांपासून मोठा उलटफेर सुरू आहे. सोन्याच्या दरात वाढ होत असून वेगवेगळ्या कारणांनी सोनं महागलं आहे. ही दर वाढ अशीच कायम राहिल्यास सोनं खरेदी करणे हे सामान्यांच्या आवाक्याबाहेर होणार असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
2/6
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाला आलेल्या ऐतिहासिक घसरणीचा थेट फटका आता सोन्याच्या बाजाराला बसू लागला आहे. मागील काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपया ९० रुपये पातळीच्या पुढे घसरला आहे. यामुळे आयात होणाऱ्या सोन्याच्या किमतींमध्ये अचानक उसळण पाहायला मिळत आहे. परिणामी एकाच आठवड्यात सोन्याचा दर तब्बल ₹५,००० ने वाढत जीएसटीसह प्रति तोळा १,३१,००० रुपयांवर पोहोचला आहे.
advertisement
3/6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणांमुळे जागतिक चलनबाजारात मोठे उलथापालथ झाल्या आहेत. डॉलर सतत मजबूत होत असताना भारतीय रुपयाने ऐतिहासिक नीचांक गाठला आहे. रुपया कमजोर झाल्याने भारताला सोन्याच्या आयातीसाठी अधिक रक्कम मोजावी लागत आहे आणि त्याचा थेट परिणाम देशांतर्गत दरांवर दिसत आहे.
advertisement
4/6
फक्त आठवडाभरापूर्वी जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा १,२६,००० रुपये होता. आता तो आठवडाभरात ५ हजारांनी वाढून १,३१,००० या उच्चांकावर पोहोचला आहे. सोन्याचा दर आता आपल्या सर्वकालिक उच्चांक (All Time High) जवळ आहे. त्यामुळे सोनं रेकोर्ड ब्रेक दर गाठू शकतो.
advertisement
5/6
या प्रचंड वाढीमुळे ज्वेलर्स तसेच ग्राहक दोघांनाही मोठा फटका बसला आहे. लग्नाचा हंगाम सुरू होत असताना सोन्याचे दर नियंत्रणाबाहेर गेल्यामुळे सामान्य ग्राहकांचे संपूर्ण बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
advertisement
6/6
दरम्यान, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल (WGC) अहवालानुसार, 2026 मध्ये सोनं आणखी 15–30 टक्क्यांनी महाग होऊ शकतं. मात्र, जर अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने जोर धरला, तर सोने 5–20% पर्यंत स्वस्तही होऊ शकतं, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Price: सोनं खरेदी करणं आता फक्त स्वप्न राहणार! ५००० रुपयांनी महागलं, २४ कॅरेटचा दर किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल