TRENDING:

राम नवमीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ! पाहा काय सुरू आहे आजचा भाव

Last Updated:
Gold Silver Prices : जागतिक स्तरावर घडणाऱ्या घटनांचा परिणाम हा सोन्या-चांदीच्या किंमतीवर होत असतो. ज्यामुळे त्यांच्या किंमती सातत्याने कमी-जास्त होतात. आज सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. चला पाहूया काय आहे दर...
advertisement
1/7
राम नवमीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ! पाहा काय सुरू आहे आजचा भाव
सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये सातत्याने चढ-उतार येताना दिसताय. 3 दिवसांपूर्वी चांदीत मोठी घसरण झाली होती. तर सोन्याच्या किंमतीही कमी झाल्या होत्या. मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी सोनं-चांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळतेय.
advertisement
2/7
आज 26 मार्च 2026 रोजी देशभरात सोनं आणि चांदीच्या किंमतीत वाढ झाली. रामनवमीच्या निमित्ताने ज्वेलरीची मागणी वाढल्याने किंमती वाढल्या आहेत. MCX आज सकाळी रामनवमी निमित्त पहिल्या सत्रात बंद राहील. पण संध्याकाळच्या सत्रात पुन्हा ट्रेडिग सुरू होईल. जी 5 वाजेपासून रात्री 11:30 पर्यंत चालेल.
advertisement
3/7
दिल्लीच्या बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत कालच्या तुलनेत वाढ नोंदवण्यात आलीये. 24 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव दिल्लीत 1,46,830 रुपये आहे. तर मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैद्राबादमध्ये 1,46,680 एवढा आहे. तर पुणे आणि बंगळुरूमध्ये सोन्याचा भाव 1,46,680 प्रति 10 ग्राम एवढा आहे.
advertisement
4/7
चांदीचा भाव : चांदीचे भावही आज वाढून 2,50,100 रुपये प्रति किलोग्रामवर पोहोचलेय. दिल्ली बुलियन बाजारात चांदीत कालच्या तुलनेत जवळपास 11,250 रुपयांची तेजी दिसली. काल दिल्लीमध्ये सोन्याचा भाव जवळपास 4,900 रुपयांनी वाढला होता.
advertisement
5/7
आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डची किंमत 4,556.55 डॉलर प्रति औसच्या जवळपास होती. स्पॉट सिल्व्हर 72.67 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होते. अमेरिका आणि इरानमध्ये संभाव्य सीजफायरच्या वृत्ताने क्रूड ऑइल आणि डॉलरच्या किंमतीत कमतरता आलीये. ज्याचा परिणाम सोन्यावर झालाय.
advertisement
6/7
किंमती वाढण्याचं कारण काय? : जागतिक स्तरावर भू-राजकिय तणाव आणि महागाईची शक्यता सोन्याला सुरक्षित गुंतवणूक म्हणून आकर्षक ठरवते. चांदीही इंडस्ट्रियल डिमांड आणि गुंतवणूक दोन्हीमुळे डिमांडमध्ये आहे. जानेवारी 2026 मध्ये चांदीचा भाव 4 लाख प्रति किलोग्रामवर आलाय. सध्या सोनं आणि चांदी दोन्हीही चांगल्या स्थितीत आहेत. जागतिक अनिश्चितता कायम राहिल्यास, यानंतरही किंमती वाढू शकतात. देशांतर्गत बाजारात सण-उत्सव आणि लग्नसराईचा सीझन आहे. ज्यामुळे सोन्याची मागणी वाढतेय.
advertisement
7/7
खरेदीदारांसाठी काय सल्ला : ज्वेलरी खरेदी करताना फक्त सोन्याच्या भावावर लक्ष केंद्रीत करू नका. मेकिंग चार्ज, जीएसटी आणि इतर खर्च मिळून एकूण खर्च चेक करा. गुंतवणुकीसाठी सोनं खरेदी करत असाल तर 22 किंवा 24 कॅरेट हॉलमार्कचे गोल्ड बार किंवा नाणी खरेदी करणं बेस्ट ऑप्शन ठरू शकतं. विशेषज्ञ म्हणतात की, दीर्घकाळात सोनं चांगलं रिटर्न देऊ शकतं. पण विकण्याची वेळ चांगली निवडावी.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
राम नवमीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ! पाहा काय सुरू आहे आजचा भाव
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल