TRENDING:

सोन्याच्या किंमतींनी पकडली रॉकेटची स्पीड! चांदी तब्बल 6 हजारांनी महागली

Last Updated:
सोने आणि चांदीच्या किंमतीत आज 6 मार्च रोजी पुन्हा तेजी पाहायला मिळाली आहे. चला जाणून घेऊया सोन्या चांदीच्या किंमतीत किती रुपयांनी वाढ झाली.
advertisement
1/9
सोन्याच्या किंमतींनी पकडली रॉकेटची स्पीड! चांदी तब्बल 6 हजारांनी महागली
आंतरराष्ट्रीय बाजारातही गोल्ड रेटमध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. स्पॉट गोल्डच्या किंमती 5,076.09 डॉलर प्रति औंस स्थिर राहिल्या. तर एप्रिल डिलिव्हरीसाठी अमेरिकन गोल्ड फ्यूचर्स 0.1% वाढून 5,084.50 डॉलरवर पोहोचल्या आहेत. जियो-पॉलिटिकल टेन्शन आणि आर्थिक अनिश्चितते दरम्यान सोन सलग नवीन विक्रम गाठत आहे.
advertisement
2/9
आज, 6 मार्च रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. एमसीएक्सवर, 22 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत 1326 रुपयांनी वाढून 160999 रुपयांवर आणि 1 किलो चांदीची किंमत 6139 रुपयांनी वाढून 268330 रुपयांवर पोहोचली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे भाव वाढत आहेत.
advertisement
3/9
स्पॉट गोल्डच्या किंमती 5,076.09 डॉलर प्रति औंसवर स्थिर राहिल्या. तर एप्रिल डिलिव्हरीसाठी अमेरिकन गोल्ड फ्यूचर्स 0.1% वाढून 5,084.50 डॉलरवर पोहोचल्या आहेत. तर स्पॉट सिल्व्हर 0.1% वाढून 82.26 डॉलर प्रति औंस झाले आहेत. या वर्षी आता सोन्याच्या किंमतीत जवळपास 18% ची तेजी आली आहे. जियो-पॉलिटिकल टेन्शन आणि आर्थिक अनिश्चितते दरम्यान सोनं सलग नवीन विक्रम गाठत आहे.
advertisement
4/9
सोन्यातील तेजी कमी का होत नाहीये? : मिडिल ईस्टमध्ये वाढत्या तणावादरम्यान सोनं जवळपास 5,125 डॉलर प्रति औंसच्या जवळपास व्यवहार करताना दिसत आहे आणि घसरणीनंतर आता तेजी पाहायला मिळत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष सात दिवसांपासून सुरु आहे. ज्यामुळे सेफ-हेवन डिमांड वाढली आहे.
advertisement
5/9
भू-राजकीय जोखीम आणि वाढत्या तेलाच्या किमतींमुळे महागाईची चिंता वाढली आहे, ज्यामुळे व्यापाऱ्यांना या वर्षी फेडरल रिझर्व्हकडून फक्त एकच व्याजदर कपात अपेक्षित आहे, जी या आठवड्याच्या सुरुवातीला दोन होती. अमेरिकेतील अलीकडील आकडेवारी देखील मजबूत आर्थिक परिस्थिती दर्शवते, ज्यामध्ये कमी बेरोजगारी दावे, सुधारित उत्पादकता, कमी नोकऱ्या कपात आणि अपेक्षेपेक्षा वेगवान सेवा क्षेत्राची वाढ यांचा समावेश आहे.
advertisement
6/9
यापुढेही सोन्याचे दर वाढणार? : स्पष्टपणे, पारंपारिक सुरक्षित मालमत्तांनीही सातत्यपूर्ण कामगिरी केली नसल्यामुळे, एकच सुरक्षित पर्याय ओळखणे कठीण झाले आहे. सोन्याच्या किंमतींमध्ये वेगाने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. तर गेल्या एक वर्षात कमकुवत राहिलेला अमेरिकी डॉलर पुन्हा मजबूत होताना दिसत आहे.
advertisement
7/9
विश्लेषक म्हणतात की, सोन्याच्या किमतीतील अलिकडच्या चढउतारांमुळे सुरक्षित संपत्ती म्हणून सोन्याची भूमिका कमकुवत होत नाही. महागाईच्या चिंता, भू-राजकीय तणाव आणि जागतिक कर्जाच्या उच्च पातळीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याचे आकर्षण कायम आहे असे त्यांचे मत आहे.
advertisement
8/9
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, स्टेट स्ट्रिटनुसार गुंतवणूक पोर्टफोलियामध्ये सोन्याची भागिदारी अजुनही खुप कमी आहे. कंपनीच्या मते, सोन्याच्या आधारे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) मधील गुंतवणूक जागतिक फंड मालमत्तेच्या 1% पेक्षा कमी आहे, तर 5% ते 10% हिस्सा दीर्घकालीनसाठी योग्य मानला जातो.
advertisement
9/9
स्टेट स्ट्रीट इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये गोल्ड स्ट्रॅटेजीचे हेड आकाश दोषी म्हणतात की, यावर्षी सोन्याची किंमत 4 हजार डॉलरपेक्षा जास्त 6,000 डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त आहे. तर सध्या किंमत 5,000 डॉलरपेक्षा थोडी जास्त सुरु आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
सोन्याच्या किंमतींनी पकडली रॉकेटची स्पीड! चांदी तब्बल 6 हजारांनी महागली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल