Gold Rate Today: गणेशोत्सवात सराफा बाजार हालला, पुण्यातून मोठं अपडेट, तोळ्याचा आजचा दर काय?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Gold Rate Today: गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि गणेशोत्सव यामुळे सराफा बाजारात मोठ्या उलाढाली दिसत आहेत. त्यातच सोन्याच्या दराने मोठी उसळी घेतली आहे.
advertisement
1/5

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिकरीत्या सोने आणि चांदी खरेदीला मोठे महत्त्व असते. या वर्षीही या प्रथेला अपवाद नाही. बाजारात ट्रेड वॉर आणि युद्ध याच्या अस्थिरतेमुळे सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशातच पुणे सराफ बाजार मात्र ग्राहकांच्या गर्दीने गजबजलेला दिसत आहे.
advertisement
2/5
आज (शनिवार) 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 1,04,950 रुपये इतके झाले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत हा दर तब्बल 1,640 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे सध्या 1 ग्रॅम सोन्यासाठी ग्राहकांना 10,495 रुपये मोजावे लागत आहेत. किमतीत झालेली ही वाढ असूनही खरेदीचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांतील ज्वेलर्सच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे.
advertisement
3/5
सोन्याबरोबरच चांदीच्याही किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सध्या 1 किलो चांदीसाठी 1,21,000 रुपये इतका दर आकारला जात आहे, जो शुक्रवारच्या तुलनेत 1,100 रुपयांनी जास्त आहे. यामुळे चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाही अधिक खर्च करावा लागत आहे. सोन्याच्या तुलनेत चांदी दर जास्त असल्याने काही ग्राहक गुंतवणुकीसाठी सोनेच पहिली पसंती ठरत आहे.
advertisement
4/5
ज्वेलर्स सांगतात की, गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळी हे सण सोने-चांदी खरेदीचे मोठे पर्व असतात. शुभमुहूर्तावर सोने खरेदी करण्याची प्रथा असल्याने बाजारात मागणी वाढते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती, ट्रेड वॉर, आणि चलनातील चढ-उतारामुळे सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. त्यासोबत स्थानिक पातळीवरील मागणीही प्रचंड असल्याने दर आणखी वर जाण्याची शक्यता आहे.
advertisement
5/5
सराफा बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, येणाऱ्या काही आठवड्यांत सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते. चांदीचे दरही त्याच प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांनी अजून खरेदी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे सल्ले देण्यात येत आहेत. सोनं-चांदीच्या वाढत्या किमती, येणारा सणांचा हंगाम आणि ग्राहकांचा वाढता कल पाहता, सराफ बाजारात खरेदीचा उत्साह पुढील काही दिवस कायम राहणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Rate Today: गणेशोत्सवात सराफा बाजार हालला, पुण्यातून मोठं अपडेट, तोळ्याचा आजचा दर काय?