TRENDING:

Gold Silver Price: 13000 रुपयांनी घसरलं सोनं, अर्ध्या किंमतीवर आली चांदी, २२ आणि १८ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार पैसे?

Last Updated:
Gold Silver Price: दागिने आताच करुन घ्या! युद्धजन्य परिस्थितीतही सोन्या चांदीचे दर वाढण्याऐवजी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहेत. यामागे काय कारण आहे आणि आजचे दर काय आहेत?
advertisement
1/7
 13000 रुपयांनी घसरलं सोनं, अर्ध्या किंमतीवर आली चांदी, २२ आणि १८ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार पैसे?
लग्नसराईमुळे आता पुन्हा सोनं खरेदीची लगबग वाढली आहे. तुम्ही सोनं खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली घसरणीची मालिका आज, २३ मार्च रोजीही कायम आहे.
advertisement
2/7
विशेष म्हणजे, अवघ्या सात दिवसांत २४ कॅरेट सोन्याचे दर तब्बल १३,६९० रुपयांनी खाली आले आहेत. सोन्यासोबतच चांदीनेही गुंतवणूकदारांना मोठा झटका दिला असून, चांदीच्या किमतीतही मोठी घट पाहायला मिळत आहे.
advertisement
3/7
मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 45 हजार ६०० रुपयांवर पोहोचले आहेत. तर २२ कॅरेट १ लाख ३५ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. २० कॅरेट सोन्याचे दर १ लाख २१ हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. १८ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ९ हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
advertisement
4/7
काही महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेली चांदी आता वेगाने खाली येत आहे. जानेवारी महिन्यात ४ लाखांचा टप्पा ओलांडणारी चांदी आज २,४४,९०० रुपये प्रति किलोवर आली आहे. एका आठवड्यात चांदीच्या भावात तब्बल ३०,००० रुपयांची घसरण झाली आहे. ज्यांनी चढ्या दरात चांदी खरेदी केली होती, त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
advertisement
5/7
मुंबई, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,४५,९६० रुपये, तर २२ कॅरेटसाठी १,३३,७९० रुपये मोजावे लागत आहेत. राजधानी दिल्लीमध्ये २४ कॅरेट सोने १,४६,११० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. नागपूर आणि नाशिकमध्ये दरात मोठी कपात झाली असून भाव मुंबईतील दर मात्र स्थिर आहेत.
advertisement
6/7
डॉलरची वाढती ताकद आणि जागतिक बँकांनी व्याजदरांबाबत घेतलेली कडक भूमिका यामुळे सोन्यावर दबाव निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार सध्या सोन्यापेक्षा डॉलरला अधिक पसंती देत आहेत.
advertisement
7/7
लग्नसराईचे दिवस जवळ येत असताना सोन्याचे भाव पडणे ही सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बाब आहे. मात्र, विश्लेषकांचा असाही अंदाज आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींमुळे किमतीत अजूनही चढ-उतार होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल, तर ही वेळ फायदेशीर ठरू शकते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold Silver Price: 13000 रुपयांनी घसरलं सोनं, अर्ध्या किंमतीवर आली चांदी, २२ आणि १८ कॅरेटसाठी किती मोजावे लागणार पैसे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल