TRENDING:

Gold : हे दार उघडलं तर सोनंच सोनं! बंद दरवाजामागचं रहस्य उलगडलं तर प्रत्येक भारतीय बनेल श्रीमंत

Last Updated:
आपल्याच देशात एक अशी गूढ गुहा आहे, जिथे सोन्याचा अफाट खजिना दडलेला असल्याचा दावा केला जातो. आश्चर्य म्हणजे, ब्रिटिशांनी तोफा लावूनही हा खजिना त्यांना हस्तगत करता आला नाही.
advertisement
1/8
हे दार उघडलं तर सोनंच सोनं! रहस्य उलगडलं तर प्रत्येक भारतीय बनेल श्रीमंत
सोन्याचे दर</a> गगनाला भिडले आहेत, तेव्हा प्रत्येकालाच वाटतं की आपल्या पूर्वजांनी एखादा खजिना मागे ठेवला असता तर? आज आपण श्रीमंत झालो असतो. पण सर्वांनाच हे माहित आहे की हे कल्पनेपर्यंत ठिक आहे. पण असं घडणं हे अशक्यच आहे. त्यासाठी एखादा चमत्कारच व्हायला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याच देशात एक अशी गूढ गुहा आहे, जिथे सोन्याचा अफाट खजिना दडलेला असल्याचा दावा केला जातो. आश्चर्य म्हणजे, ब्रिटिशांनी तोफा लावूनही हा खजिना त्यांना हस्तगत करता आला नाही." width="1200" height="900" /> सोनं म्हटलं की भारतीयांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक येते. मग ते घरातील दागिन्यांच्या रूपात असो किंवा गुंतवणुकीच्या. आज जेव्हा सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत, तेव्हा प्रत्येकालाच वाटतं की आपल्या पूर्वजांनी एखादा खजिना मागे ठेवला असता तर? आज आपण श्रीमंत झालो असतो. पण सर्वांनाच हे माहित आहे की हे कल्पनेपर्यंत ठिक आहे. पण असं घडणं हे अशक्यच आहे. त्यासाठी एखादा चमत्कारच व्हायला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याच देशात एक अशी गूढ गुहा आहे, जिथे सोन्याचा अफाट खजिना दडलेला असल्याचा दावा केला जातो. आश्चर्य म्हणजे, ब्रिटिशांनी तोफा लावूनही हा खजिना त्यांना हस्तगत करता आला नाही.
advertisement
2/8
काय आहे या सोन्याच्या गुहेचे रहस्य?बिहारमधील नालंदा जिल्ह्यात वसलेले राजगीर शहर हे ऐतिहासिक रहस्यांसाठी ओळखले जाते. याच राजगीरच्या विभारगिरी पर्वताच्या पायथ्याशी एक मानवनिर्मित गुहा आहे, जिला लोक 'सोन भंडार' म्हणतात. शतकानुशतके ही गुहा इतिहासकार आणि वैज्ञानिकांसाठी एक न उलगडणारे कोडे बनली आहे.
advertisement
3/8
1. सम्राट बिंबिसार आणि अफाट खजिनाइतिहासाच्या पानांमध्ये डोकावले तर असे मानले जाते की, मगध सम्राट आणि हर्यक वंशाचे संस्थापक बिंबिसार यांच्या काळात हा खजिना येथे लपवण्यात आला होता. जेव्हा अजातशत्रूने सत्तेसाठी आपल्याच पित्याला (बिंबिसार) कैद केले, तेव्हा बिंबिसारच्या पत्नीने राज्याचा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी या गुहेची निर्मिती केली आणि तिथे सर्व सोनं लपवून ठेवलं आहे.
advertisement
4/8
2. जरासंधाची पौराणिक कथाकाही पौराणिक कथांनुसार, या गुहेचा संबंध महाभारतातील जरासंधाशी आहे. वायू पुराणानुसार, जरासंधाने 80 पेक्षा जास्त राजांना हरवून त्यांची संपत्ती याच भागात लपवली होती. भीम आणि जरासंधाच्या युद्धात जरासंधाचा वध झाला आणि त्या खजिन्याचे रहस्य कायमचे दफन झाले, असेही मानले जाते.
advertisement
5/8
3. ब्रिटिशांच्या तोफाही झाल्या निकामीया गुहेच्या प्रवेशद्वारावर एक विशाल दगडी भिंत किंवा दरवाजा आहे. असं म्हणतात की, भारत गुलामगिरीत असताना इंग्रजांना या खजिन्याचा सुगावा लागला होता. त्यांनी हा खजिना लुटण्यासाठी गुहेच्या दरवाजावर तोफा डागल्या, पण त्या दरवाजाला साधा तडाही गेली नाही. आजच त्या तोफेच्या गोळ्यांच्या खुणा या गुहेवर स्पष्टपणे पाहायला मिळतात.
advertisement
6/8
4. शिलालेख की खजिन्याची 'चावी'?गुहेच्या भिंतीवर एक रहस्यमयी शिलालेख कोरलेला आहे. ही शंख लिपी किंवा गुप्त संकेतांमध्ये लिहिलेली असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार, ज्या दिवशी कोणीतरी हा शिलालेख वाचण्यात यशस्वी होईल, त्या दिवशी या खजिन्याचा दरवाजा आपोआप उघडेल. दुर्दैवाने, आजपर्यंत जगातील कोणताही विद्वान ही लिपी पूर्णपणे उलगडू शकलेला नाही. असं सांगितलं जातं की यामध्ये एवढं सोनं आहे ती तो भारतातील प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत बनवू शकतं.
advertisement
7/8
5. वास्तुकलेचा अद्भूत नमुनापुरातत्व विभागाने येथे उत्खनन केले असता खजिना तर सापडला नाही, पण या गुहेची रचना पाहून तेही थक्क झाले. येथे एक मोठी आणि एक छोटी अशा दोन गुहा आहेत. येथे जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, भगवान विष्णूची प्रतिमा आणि मौर्य आणि गुप्तकालीन शिलालेख आढळतात. काही इतिहासकार याला जैन मुनींनी बनवलेली गुहा मानतात, तर काही जण याला बौद्ध धर्माशी जोडतात, कारण येथेच भगवान बुद्धांनी बिंबिसारला उपदेश दिला होता.
advertisement
8/8
आजही हजारो पर्यटक या गुहेला भेट देण्यासाठी येतात. काहींसाठी ही केवळ एक दंतकथा आहे, तर काहींसाठी हा विज्ञानाला दिलेले आव्हान आहे. सोन्याचा खजिना तिथे आहे की नाही, हे अद्याप सिद्ध झालेले नसले तरी, ही गुहा भारताच्या वैभवशाली आणि पराक्रमी इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे यात शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Gold : हे दार उघडलं तर सोनंच सोनं! बंद दरवाजामागचं रहस्य उलगडलं तर प्रत्येक भारतीय बनेल श्रीमंत
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल