TRENDING:

Fixed Deposit: गॅरेंटी आणि सुरक्षित रिटर्न हवेत? या ५ सरकारी बँका देतायत सर्वाधिक व्याज!

Last Updated:
बँक ऑफ महाराष्ट्र 366 दिवसांच्या एफडीवर 7.15% व्याज देत आहे. इंडियन ओव्हरसीज बँक 444 दिवसांसाठी 7.10%, तर पंजाब अ‍ॅन्ड सिंध बँक 7.05% व्याज देते. FD सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे.
advertisement
1/7
गॅरेंटी आणि सुरक्षित रिटर्न हवेत? या ५ सरकारी बँका देतायत सर्वाधिक व्याज!
आजच्या अस्थिर गुंतवणुकीच्या काळात अनेकजण थोडं कमी मिळाला तरी चालेल, पण पैशात गॅरंटी हवी असं म्हणतात. बाजार कधी वर तर कधी थेट घसरतो. पण फिक्स्ड डिपॉजिट (FD) ही एक अशी गुंतवणूक आहे, जिथं ना तोट्याची भीती नाही, त्यामुळे जेवढे पैसे गुंतवले तेवढे तर नक्की मिळणार, रिटर्न चांगले मिळतील हे दुय्यम भाग झाला. पण पैसे बुडणार नाहीत हे निश्चित असतं.
advertisement
2/7
खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँका अगदी 7.15% पर्यंत व्याज देत आहेत, जे एफडीसारख्या सुरक्षित पर्यायात एकदम आकर्षक मानलं जातं. म्हणजेच, निवृत्त नागरिक, गृहिणी, मध्यमवर्गीय कुटुंबं जिथं गुंतवणुकीसोबत सुरक्षित रिटर्नची हमी असते अशा ठिकाणी गुंतवणं सुरक्षित समजतात त्यामुळे त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.
advertisement
3/7
बँक ऑफ महाराष्ट्र सध्या सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या बँकांमध्ये आघाडीवर आहे. इथे 366 दिवसांच्या एफडीवर 7.15% व्याज मिळतं. एखाद्या वर्षासाठी घरखर्चाची जास्तीत जास्त बचत ठेवण्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो. १ वर्षासाठी 6.25%, ३ वर्षांसाठी 6.30% आणि ५ वर्षांसाठी 6.25% व्याजदरही बँक देते.
advertisement
4/7
इंडियन ओव्हरसीज बँक 444 दिवसांच्या एफडीवर 7.10%, तर इतर कालावधींसाठी 6.30–6.70% दर देते. पंजाब अ‍ॅन्ड सिंध बँक 444 दिवसांसाठी 7.05%, तर ५ वर्षांसाठीही 6.35% इतकं स्थिर व्याज देते, जे दीर्घकाळासाठी फायद्याचं ठरू शकतं.
advertisement
5/7
बँक ऑफ इंडिया 999 दिवसांच्या ग्रीन एफडीवर 7%, आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया खास 1111, 2222, 3333 दिवसांच्या एफडीवरही 7% व्याजदर देते. शिवाय, इतर कालावधींसाठीही दर 6.50–6.75% च्या आसपास आहेत.
advertisement
6/7
जर तुम्हाला शेअर बाजाराचं थरार नको असेल, आणि तुमच्या पैशाला गॅरंटी हवी असेल, तर FD हा अजूनही एक विश्वासार्ह आणि शांत गुंतवणुकीचा पर्याय आहे. विशेषतः सध्याच्या व्याजदराच्या टप्प्यावर गुंतवणूक करून तुम्ही पुढील 2–5 वर्षांची निश्चितता मिळवू शकता.
advertisement
7/7
एफडी न्यूज
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Fixed Deposit: गॅरेंटी आणि सुरक्षित रिटर्न हवेत? या ५ सरकारी बँका देतायत सर्वाधिक व्याज!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल