HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार ATM संबंधित नियम
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
HDFC Bank ने घोषणा केली की 1 एप्रिल 2026 पासून यूपीआयच्या माध्यमातून एटीने कॅश काढण्यासंदर्भात एक मोठा बदल केला जाईल. चला जाणून घेऊया हा बदल नेमका काय आहे.
advertisement
1/8

एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. 1 एप्रिल 2026 पासून, यूपीआय वापरून एटीएममधून पैसे काढणे मासिक फ्री एटीएम ट्रांझेक्शन लिमिटमध्ये समाविष्ट केले जाईल.म्हणजेच, UPIने पैसे काढणे पूर्वी फ्री होते, परंतु आता ते डेबिट कार्ड पैसे काढण्याप्रमाणेच मोजले जातील. ग्राहकांना फायदा किंवा तोटा असा आहे की जर मासिक फ्री लिमिट ओलांडली तर चार्ज आकारले जाईल.
advertisement
2/8
सेव्हिंग्स आणि सॅलरी अकाउंट असणाऱ्यांना एचडीएफसी बँकेने आपल्या एटीएमवर महिन्यात 5 फ्री ट्रांझेक्शन मिळतात. यामध्ये कॅश काढणे आणि काही नॉन-फायनेंशियल ट्रांझेक्शनचा समावेश असतो. 5 पेक्षा जास्त झाले तर प्रत्येक एक्स्ट्रा ट्रांझेक्शनवर 23 रुपये प्लस लागू टॅक्स चार्ज लागेल.
advertisement
3/8
हे चार्ज आधी दुसऱ्या बँकांच्या एटीएमवर लागू आहेत. यात मेट्रो शहरांमध्ये 3 आणि नॉन-मेट्रोमध्ये 5 फ्री ट्रांझेक्शन मिळतात. आता यूपीआय कॅश विड्रॉलही याच नियमात येईल.
advertisement
4/8
कोणत्या अकाउंट्सवर बदलाचा होणार नाही परिणाम? : काही करंट अकाउंट टाइप जसं की, बिज लाइट प्लस, बिज प्रो प्लस, बिज अल्ट्रा प्लस, बिज एलीट प्लस, फ्लेक्सी, प्लस, अॅक्टिव्ह, असेंट, मॅक्स अडवांटेज, मॅक्स, प्रोफेशनल, ईकॉम, एपेक्स, अल्टिमा , फ्लेक्सी, मर्चेंट अडव्हांटेज प्लस, मर्चेंट अडवांटेज , सुप्रीम, स्टार्टअप, स्मार्टअप मॅक्स, स्मार्टअप ग्रोथ, गीगा करंट अकाउंटच्या ग्राहकांना एचडीएफसी एटीएमवर अनलिमिटेड फ्री ट्रांझेक्शन मिळतात. या अकाउंट्सवर या बदलाचा परिणाम होणार नाही.
advertisement
5/8
बँक UPI रोख रक्कम काढणे हे स्टँडर्ड ATM काढण्याच्या नियमांशी एकत्रित करू इच्छित असल्याने हा बदल करण्यात आला आहे. पूर्वी, UPI पैसे काढणे वेगळे मोजले जात नव्हते, परंतु आता 1 एप्रिल 2026 पासून ते समाविष्ट केले जातील. ग्राहक HDFC ATM किंवा या फीचरला समर्थन देणाऱ्या इतर बँक ATM वरून PayZapp, BHIM, PhonePe, Paytm आणि GPay सारख्या UPI अॅप्सचा वापर करून कार्डशिवाय पैसे काढू शकतात. QR कोड स्कॅन करून पैसे काढणे सोपे आहे.
advertisement
6/8
इंटरनॅशनल एटीएमवर वेगळे चार्ज : ग्राहकांवर असा परिणाम होईल की, जे लोक महिन्यात जास्त कॅश काढतात. विशेषतः यूपीआयमधून त्यांना आता सावध राहावे लागेल. लिमिट पार झाली तर 23 रुपये प्लस टॅक्स प्रत्येक वेळी द्यावा लागेल.
advertisement
7/8
बँकेने म्हटले की, डोमेस्टिक मर्चेंट लोकेशन किंवा वेबसाइटवर डेबिट कार्डने पेमेंटवर कोणताही चार्ज नाही. शिवाय काही निवडक मर्चेंट जसं की, आयआरसीटीसीवर 1.8 टक्के किंवा रेल्वे स्टेशनवर 30 रुपये फ्लॅट प्लस 1.8 टक्के. इंटरनॅशनल एटीएमवर वेगळे चार्ज आहेत. जसं बॅलेन्स इंक्वायरीवर 25 रुपये प्लस टॅक्स आणि कॅश विड्रॉलवर 125 रुपये प्लस टॅक्स, सोबतच क्रॉस-करेंसी मार्कअप.
advertisement
8/8
बँकेने ग्राहकांना कळवले आहे की, हा नियम 1 मे 2025 पासून लागू होईल. इतर बँकांच्या एटीएमवरील शुल्क 21 रुपयांवरून 23 रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे आणि आता त्यात UPI चा समावेश आहे. अनावश्यक शुल्क टाळण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या खात्याचा प्रकार तपासण्याचा आणि मासिक पैसे काढण्याचे नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हा बदल डिजिटल बँकिंग सुलभ करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सामान्य ग्राहकांना काही काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 एप्रिलपासून बदलणार ATM संबंधित नियम