TRENDING:

PPF स्किमध्ये दरवर्षी 50 हजार रुपये जमा केल्यास मॅच्योरिटीवर किती मिळतील? पाहा गणित

Last Updated:
पीपीएफ स्किममध्ये अनेक भारतीय गुंतवणूक करतात. कारण यामध्ये फिक्स्ड रिटर्न मिळतं. यासोबतच कोणती जोखिमही नसते. चला आज आपण या स्किमविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/7
PPF स्किमध्ये दरवर्षी 50 हजार रुपये जमा केल्यास मॅच्योरिटीवर किती मिळतील? पाहा गणित
Post Office PPF Scheme: आपण कमाई करत असलेल्या पैशांतील काही पैसे आपण सेव्हिंगमध्ये टाकतो. पैसे सेव्ह करताना ते सुरक्षित ठिकाणी असावेत असं प्रत्येकालाच वाटतं. यामुळे सरकारने देशातील सामान्य लोकांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी अनेक प्रकारच्या बचत योजना सुरू केल्या आहेत. यामधील एक म्हणजे पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडेंट फंड स्किमही आहे. ती केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी स्किम आहे.
advertisement
2/7
पीपीएफ ही दीर्घकाळापासून सुरू असलेली प्रसिद्ध बचत स्किम आहे. पीपीएफवर सध्या 7.1 टक्के वार्षिक व्याज मिळतं. पण तुम्ही पीपीएफ स्किममध्ये गुंतवणूक करत असाल तर तुम्हाला एका वर्षात किमान एकदा पैसे जमा करावे लागतात. यासाठी तुम्ही तुमच्या सुविधेसाठी अकाउंटमध्ये दरवर्षी एकरकमी पैसा जमा करू शकतात. किंवा मग जास्तीत जास्त 12 हप्त्यांमध्ये पैसा जमा करू शकतात.
advertisement
3/7
तुम्ही फक्त 500 रुपयांच्या वार्षिक गुंतवणुकीसह देखील हे अकाउंट ओपन करू शकता. पीपीएफ अकाउंट पीपीएफ स्किमअंतर्गत एक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पीपीएफ अकाउंट 15 वर्षात मॅच्योर होते. पीपीएफ अकाउंटला पोस्ट ऑफिससोबतच कोणत्याही बँके ओपन केले जाऊ शकते.
advertisement
4/7
तुम्ही तुमच्या पीपीएफ अकाउंटमध्ये दर वर्षी 50,000 रुपयांची गुंतवणूक केली तर 15 वर्षात म्हणजे मॅच्योरिटीवर तुम्हाला एकूण 13,56,070 रुपये मिळतील. ज्यात तुमच्या गुंतवणुकीच्या 7,50,000 रुपये आणि व्याजाच्या 6,06,070 रुपयांचा समावेश आहे.
advertisement
5/7
पीपीएफ अकाउंटवर मिळते लोनची सुविधा : पीपीएफ अकाउंटसह तुम्हाला अनेक प्रकारच्या सुविधाही मिळतात. पीपीएफ अकाउंटसह तुम्हाला सहज लोनही मिळू शकतं. खरंतर एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल की, दरवर्षी किमान 500 रुपये तरी जमा करावे लागतील.
advertisement
6/7
तुम्ही एक वर्षात किमान 500 रुपयेही जमा केले नाहीत तर तुमचं अकाउंट बंद होईल. मात्र यावर टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही थोडा दंड भरुन ते पुन्हा अॅक्टिव्ह करू शकता.
advertisement
7/7
पीपीएफ अकाउंट ओपन केल्याच्या तारीखेच्या 5 वर्षांपर्यंत तुम्ही या अकाउंटमधून पैसे काढू शकत नाहीत. मात्र 5 वर्षांनंतर काही खास परिस्थितीमध्ये म्हणजेच, गंभीर आजार, मुलांचं शिक्षण अशा कामांसाठी तुम्ही पीपीएफमधून पैसे काढू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
PPF स्किमध्ये दरवर्षी 50 हजार रुपये जमा केल्यास मॅच्योरिटीवर किती मिळतील? पाहा गणित
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल