Indian Ralilway : ट्रेनमध्ये कोणाला मिळते फ्री प्रवास करण्याची सुविधा? याचे नियम आणि अटी आत्ताच समजून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की असं कोण आहे ज्यांना रेल्वेचा प्रवास फ्रीमध्ये दिला जातो. चला जाणून घेऊया, कोणाकोणाला मिळतो हा 'खास' दिलासा.
advertisement
1/10

भारतीय रेल्वे ही आपल्या देशाची जीवनवाहिनी आहे. दररोज लाखो लोक एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेचा आधार घेतात. प्लॅटफॉर्मवरची गर्दी, लांबच लांब रांगा आणि आरक्षणाची लगबग हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे. पण तुम्हाला माहित आहे का? रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला पूर्ण तिकीट काढावे लागतेच असे नाही. समाजातील काही खास वर्गांसाठी भारतीय रेल्वेने प्रवासात मोठी सवलत, अगदी मोफत प्रवासाचीही तरतूद केली आहे.
advertisement
2/10
आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की असं कोण आहे ज्यांना रेल्वेचा प्रवास फ्रीमध्ये दिला जातो. चला जाणून घेऊया, कोणाकोणाला मिळतो हा 'खास' दिलासा.
advertisement
3/10
1. दिव्यांग बांधवांसाठी विशेष सुविधाभारतीय रेल्वे दृष्टीनसलेले, व्हीलचेअरवर असणारे किंवा गंभीर शारीरिक अपंगत्व असलेल्या प्रवाशांना प्रवासात मोठी सवलत देते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अशा प्रवाशांसोबत असणाऱ्या एका मदतनीसाला (Helper) देखील मोफत किंवा अतिशय कमी दरात प्रवासाची परवानगी मिळते.
advertisement
4/10
2. मानसिक आजार असलेल्या व्यक्तीमानसिक आजार असलेल्या प्रवाशांनाही रेल्वेने प्रवासात सवलत दिली आहे. मात्र, अशा प्रवाशांसोबत एक अटेंडंट असणे अनिवार्य आहे. प्रवासादरम्यान सरकारी रुग्णालयाने दिलेले अधिकृत वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.
advertisement
5/10
3. गंभीर आजार: कॅन्सर आणि टीबी रुग्णकर्करोग (Cancer) आणि क्षयरोग (TB) यांसारख्या गंभीर आजारांशी झुंज देणाऱ्या रुग्णांना रेल्वे प्रवासात विशेष सवलत मिळते. रुग्ण आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका मदतनीसाला तिकीट दरात मोठी सूट किंवा काही प्रसंगी मोफत प्रवासाचा लाभ दिला जातो, जेणेकरून उपचारासाठी येणारा प्रवासाचा खर्च कमी व्हावा.
advertisement
6/10
4 ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासावयाची 60 वर्षे पूर्ण केलेले पुरुष आणि 58 वर्षे पूर्ण केलेल्या महिला किंवा ट्रान्सजेंडर प्रवाशांना रेल्वे तिकिटाच्या मूळ किमतीत सवलत मिळते. ही सुविधा पूर्णपणे मोफत नसली, तरी यामुळे प्रवासाचा आर्थिक भार बराच कमी होतो.
advertisement
7/10
5. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सवलतविद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वेने खास सवलती दिल्या आहेत:मुलींसाठी: पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी (Graduation) सवलत.मुलांसाठी: 12 वी पर्यंतच्या शिक्षणासाठी सवलत. या सुविधेसाठी शिक्षण संस्थेचे ओळखपत्र आणि प्रमाणपत्र जवळ असणे गरजेचे आहे.
advertisement
8/10
6. रेल्वे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयरेल्वे कर्मचाऱ्यांना वर्षातून ठराविक वेळा 'प्रिव्हिलेज पास' दिले जातात, ज्याद्वारे ते आणि त्यांचे कुटुंबीय मोफत प्रवास करू शकतात. तसेच, PTO (Privilege Ticket Order) अंतर्गत केवळ एक-तृतीयांश भाडे भरून प्रवासाची सोय असते.
advertisement
9/10
लक्षात ठेवा 'हे' महत्त्वाचे नियमरेल्वेच्या या सुविधांचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अनिवार्य आहे:कागदपत्रे: वैध ओळखपत्र, मेडिकल सर्टिफिकेट किंवा संबंधित संस्थेचे प्रमाणपत्र प्रवासादरम्यान सोबत ठेवा.या सवलती पूर्णपणे मोफत नसून रेल्वेच्या नियमांनुसार बदलू शकतात.कोणत्याही सवलतीचा लाभ घेताना योग्य कागदपत्रे नसल्यास, तो विनातिकीट प्रवास मानला जातो आणि मोठा दंड भरावा लागू शकतो.
advertisement
10/10
भारतीय रेल्वेने दिलेली ही सवलत गरजू लोकांसाठी एक मोठा आधार आहे. त्यामुळे तुमच्या आसपास अशा व्यक्ती असतील ज्यांना या सवलतींची गरज आहे, तर त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Indian Ralilway : ट्रेनमध्ये कोणाला मिळते फ्री प्रवास करण्याची सुविधा? याचे नियम आणि अटी आत्ताच समजून घ्या