TRENDING:

Indian Railway Fact : रेल्वे रुळांमध्ये खडीच का टाकली जाते, सिमेंट का नाही? 99 टक्के लोकांना देताच येणार नाही उत्तर

Last Updated:
यामागे कोणतीही जुनी परंपरा नसून एक अत्यंत महत्त्वाचं आणि रंजक विज्ञान दडलेलं आहे. चला तर मग, रुळांमधल्या या खडीचं रहस्य सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
1/9
रेल्वे रुळांमध्ये खडीच का टाकली जाते, सिमेंट का नाही? माहितीय का कारण?
रेल्वेने प्रवास करताना आपण खिडकीतून बाहेर बघितलं की रेल्वेचे रूळ आणि त्याखाली पसरलेली काळी-पांढरी खडी आपल्याला हमखास दिसते. पण कधी विचार केलाय का, की जग इतकं प्रगत झालंय, आपण सिमेंटचे रस्ते आणि मोठमोठे फ्लायओव्हर बांधतो, मग रेल्वे रुळांच्या बाबतीत अजूनही आपण त्या जुन्या खडीचाच वापर का करतो? तिथं मस्त सिमेंटचं गुळगुळीत प्लॅटफॉर्म का बनवलं जात नाही?
advertisement
2/9
यामागे कोणतीही जुनी परंपरा नसून एक अत्यंत महत्त्वाचं आणि रंजक विज्ञान दडलेलं आहे. चला तर मग, रुळांमधल्या या खडीचं रहस्य सोप्या भाषेत समजून घेऊया.
advertisement
3/9
रेल्वे रुळांमध्ये खडीच का टाकली जाते, सिमेंट का नाही? यामागे आहेत काही खास गोष्टीरेल्वे रुळांखाली असलेल्या या दगडांना तांत्रिक भाषेत 'ट्रॅक बॅलास्ट' (Track Ballast) असं म्हणतात. हे दगड फक्त तिथे शोभेसाठी नसून ते रेल्वेच्या सुरक्षित प्रवासासाठी खूप महत्वाच्या आहेत.
advertisement
4/9
हजारो टन वजनाचा भार सोसण्यासाठीएक रेल्वे इंजिन आणि त्याचे डबे आणि त्यात लाखो लोक, हे सगळं मिळून हजारो टन वजन असतं. जेव्हा ही ट्रेन वेगाने धावते, तेव्हा रुळांवर प्रचंड दाब येतो. हे वजन पेलण्यासाठी रुळांखाली सिमेंटचे आडवे खांब (Sleeper) असतात. ही खडी या सिमेंटच्या खांबांना आपल्या जागेवरून हलून देत नाही. जर तिथे सिमेंट केलं, तर ट्रेनच्या वजनामुळे त्याला तडे जाऊ शकतात आणि त्यानंतर सिमेंट तूटून रुळ जागेवरुन हललं असतं, ज्यामुळे खूप मोठा अपघात झाला असता, पण दगड हा भार विभागून घेतात.
advertisement
5/9
कंपने (Vibrations) रोखण्यासाठीजेव्हा ट्रेन रुळावरून धावते, तेव्हा मोठी कंपने निर्माण होतात. जर रूळ थेट सिमेंटवर बसवले असते, तर या कंपनांमुळे जमिनीला हादरे बसले असते आणि रूळ तुटण्याची भीती राहिली असती. खडी या कंपनांना शोषून घेते ज्यामुळे ट्रेनचा प्रवास स्थिर होतो.
advertisement
6/9
पाण्याचा निचरा होण्यासाठीपावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचलं तर काय होईल? रूळ गंजतील आणि खालची माती वाहून जाईल. खडी टाकल्यामुळे पावसाचं पाणी रुळांवर न साचता थेट दगडांच्या फटीतून जमिनीत मुरतं. यामुळे रुळांच्या खाली चिखल होत नाही आणि ट्रॅक मजबूत राहतो.
advertisement
7/9
झाडं-झुडपं उगवू नये म्हणूनजर रुळांच्या मध्ये मोकळी माती किंवा सिमेंटमधील फटी असत्या, तर तिथे गवत आणि झाडं उगवली असती. झाडं वाढल्यामुळे ट्रेनला अडथळा निर्माण झाला असता. खडीमुळे तिथे झाडं उगवण्यासाठी पोषक वातावरण राहत नाही, त्यामुळे ट्रॅक नेहमी स्वच्छ राहतो.
advertisement
8/9
आवाजावर नियंत्रणट्रेन चालताना खूप मोठा आवाज होतो. ही खडी तो आवाज काही प्रमाणात शोषून घेते. जर तिथे सिमेंटचा सपाट रस्ता असता, तर आवाजाचे प्रतिध्वनी (Echo) उमटून तो अजूनच भीषण झाला असता.
advertisement
9/9
माणसाकडून होणारी एक छोटी चूक...अनेकांना वाटतं की ही खडी नदीतले गोल दगड आहेत. पण तसं नसतं, जर नदीतले गुळगुळीत गोल दगड वापरले, तर ते एकमेकांवरून घसरतील. म्हणूनच इथे नेहमी अणकुचीदार आणि खडबडीत दगड वापरले जातात, जे एकमेकांमध्ये घट्ट अडकून राहतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Indian Railway Fact : रेल्वे रुळांमध्ये खडीच का टाकली जाते, सिमेंट का नाही? 99 टक्के लोकांना देताच येणार नाही उत्तर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल