TRENDING:

इथे फक्त 10 रुपयांत मिळते 24 कॅरेट शुद्ध सोनं, Gold खरेदी करण्याआधी जाणून घ्या हा भन्नाट मार्ग

Last Updated:
Investing In Gold: आता सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम किंवा ज्वेलरी दुकानात जाण्याची गरज राहिलेली नाही. अगदी 10 रुपयांपासून डिजिटल गोल्ड खरेदी करता येत आहे.
advertisement
1/6
फक्त 10 रुपयांत मिळते 24 कॅरेट शुद्ध सोनं,खरेदी आधी जाणून घ्या हा भन्नाट मार्ग
आता सोने खरेदी करणे केवळ ज्वेलरी शॉपपुरते मर्यादित राहिलेले नाही. आजच्या घडीला एका कप चहाच्या किमतीइतक्या पैशांतही 24 कॅरेट शुद्ध सोने खरेदी करता येते. विशेष म्हणजे, यासाठी ना तुम्हाला कुठे बाहेर जाण्याची गरज आहे, ना मोठी रक्कम एकाच वेळी गुंतवावी लागते.
advertisement
2/6
Paytm, PhonePe आणि Google Pay यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आता मोठ्या प्रमाणावर लोक डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करत आहेत. या अ‍ॅप्सवर तुम्ही अगदी 10 रुपये, 20 रुपये किंवा 50 रुपयांपासूनही सोने खरेदी करू शकता. म्हणजेच खिशावर भार न टाकता, हळूहळू सोने जमा करण्याची सोपी आणि आधुनिक सोय उपलब्ध झाली आहे.
advertisement
3/6
डिजिटल गोल्ड हे खऱ्या 24 कॅरेट शुद्ध सोन्याशी थेट जोडलेले असते. तुम्ही जितक्या रुपयांचे सोने खरेदी करता, तितक्याच प्रमाणात फिजिकल गोल्ड सुरक्षित वॉल्टमध्ये साठवून ठेवले जाते. हे सोने पूर्णपणे विमा संरक्षित (इन्शुअर्ड) असते. गरज भासल्यास तुम्ही हे सोने कधीही विकू शकता किंवा नंतर सोन्याची नाणी किंवा दागिन्यांमध्ये रूपांतरित करून घेऊ शकता.
advertisement
4/6
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणे अतिशय सोपे आहे. Paytm, PhonePe किंवा Google Pay अ‍ॅप उघडा आणि त्यामधील “Buy Gold” किंवा “Digital Gold” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जितकी रक्कम गुंतवायची आहे ती टाका आणि एका क्लिकमध्ये सोने खरेदी करा. सोन्याचे दर रोज बाजारभावानुसार बदलत असतात, त्यामुळे त्या दिवशीचा दर लागू होतो.
advertisement
5/6
महागाईच्या काळात सोने हे नेहमीच सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवण्याची क्षमता नाही, त्यांच्यासाठी डिजिटल गोल्डचा हा पर्याय अत्यंत फायदेशीर ठरतो. छोट्या-छोट्या बचतीतून दीर्घकालीन काळात चांगला फंड तयार करता येतो.
advertisement
6/6
डिजिटल गोल्ड हे साधारणपणे शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म गुंतवणुकीसाठी अधिक योग्य मानले जाते. सोने खरेदी करण्यापूर्वी संबंधित प्लॅटफॉर्मच्या अटी, शुल्क (चार्जेस) आणि कर (टॅक्स) याबाबतची माहिती नीट तपासून घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
इथे फक्त 10 रुपयांत मिळते 24 कॅरेट शुद्ध सोनं, Gold खरेदी करण्याआधी जाणून घ्या हा भन्नाट मार्ग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल