TRENDING:

तिकीट काढताना बंद होणार तुमचं IRCTC अकाउंट, 1 जुलैपासून बदलणार नियम

Last Updated:
IRCTC तात्काळ तिकीट बुकिंगसाठी 1 जुलैपासून आधार लिंक अनिवार्य करणार आहे. फेक अकाउंट्समुळे 2 लाख खाती बंद, 20 लाख खात्यांची चौकशी सुरू आहे. KYC नसलेल्या खात्यांना 12, KYC खात्यांना 24 बुकिंग मर्यादा.
advertisement
1/7
तिकीट काढताना बंद होणार तुमचं IRCTC अकाउंट, 1 जुलैपासून बदलणार नियम
मुंबई: IRCTC वरुन तुम्ही तिकीट बुक करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. तात्काळ तिकीट आता बुक करता येणार नाही. 1 जुलैपासून नियम बदलणार आहे.
advertisement
2/7
1 जुलैपासून, IRCTC खातं आधार कार्डसोबत लिंक नसेल तर ऑनलाइन तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही. बुकिंग पूर्ण करण्यासाठी आधारावर ओटीपीचा वापर अनिवार्य केला जाईल.
advertisement
3/7
हे नियम फक्त ऑनलाइन नव्हे, तर PRS काउंटर आणि अधिकृत एजंटांच्या बुकिंगला देखील लागू होतील. त्यामुळे तुमचा फोननंबर आधारसोबत लिंक असणं आणि तिकीट बुक करताना या दोन्ही गोष्टी तुमच्यासोबत असणं अत्यावश्यक आहेत.
advertisement
4/7
नव्या नियमानुसार एजंटांना एसीसाठी सकाळी 10 ते 10:30 वेळात तिकीट बुक करण्यास मनाई असेल. नॉन-एसी वर्गासाठी, ही मर्यादा 11 ते 11:30 असेल असं सांगितलं जात आहे.
advertisement
5/7
अनेक फेक अकाउंटवरुन तिकीटं बुक करुन ती अडवून दुप्पट किंमतीने विकल्याचे प्रकार समोर येत आहेत. फसवणूक टाळण्यासाठी गेल्या काही काळात 2 लाखहून अधिक IRCTC खाती बंद करण्यात आली आहेत. आणखी 20 लाख खात्यांची चौकशी सुरू आहे.
advertisement
6/7
सर्वसामान्य प्रवाशांसाठी अधिक संधी मिळणार आहे. एजंटांच्या तिकीट होल्डिंगवर नियंत्रण राहणार.KYC नसलेल्या खात्यांसाठी महिन्याला फक्त 12 बुकिंगची मर्यादा, तर KYC-पूर्ण खात्यांना 24 वाढवण्यात आली आहे.
advertisement
7/7
IRCTC खाते साइट किंवा अ‍ॅपवर लॉग इन करून My Account, Aadhaar KYC / Manage OTP & KYC विभागावर जाऊन आधार नंबर प्रविष्ट करावा, त्यावरचा ओटीपी पडताळावा आणि खातं अपडेट करावं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
तिकीट काढताना बंद होणार तुमचं IRCTC अकाउंट, 1 जुलैपासून बदलणार नियम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल