Janmashtami Bank Holiday: आजपासून सलग तीन दिवस बँक बंद, महाराष्ट्रात काय स्थिती?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Janmashtami Bank Holiday: जन्माष्टमीला महाराष्ट्रात बँक बंद राहणार की नाही, देशभरातील बँकांची काय स्थिती?
advertisement
1/7

महिन्याच्या सुरुवातीला भारतीय रिझर्व्ह बँक सुट्ट्यांचं वेळापत्रक जाहीर करत असते. बँकेनं हॉलिडे लिस्ट जारी केली आहे. तुमची बँकेची काही कामं असतील तरी आता पुढचे तीन दिवस होऊ शकणार नाहीत. आज शनिवार, उद्या रविवार आणि त्यानंतर जन्माष्टमीनिमित्ताने बँका बंद राहणार आहेत.
advertisement
2/7
आजपासून सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. महिना सुरू होण्यापूर्वीच बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्टीची यादी जाहीर केली आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या दिवसांतही अनेक दिवस बँका बंद होत्या.
advertisement
3/7
आजपासून सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहेत. या तीन दिवसांमध्ये ऑनलाईन सेवा चालू राहील. मात्र काही वेळा सर्व्हर डाऊन होण्याची भीती असते. त्यामुळे तुम्ही महत्त्वाचे ट्रान्झाक्शन करत असाल तर आधी चेक करा आणि त्यानंतरच पेमेंट करा.
advertisement
4/7
24 ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने बँकेला सुट्टी आहे. 25 ऑगस्ट रोजी रविवार आणि सोमवार 26 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी असल्याने बँकांना साप्ताहिक सुटी असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.
advertisement
5/7
24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या कालावधीत बँकेला सतत सुट्टी असेल. याशिवाय 31 ऑगस्टला चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.बँक बंद असताना काय काम करता येईल?
advertisement
6/7
बँकेला सुट्टी असेल तर तुम्ही कोणाच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकता. याचा अर्थ बँक बंद असताना तुम्ही बँकिंग सेवेद्वारे व्यवहार पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही एटीएम मशीनच्या मदतीने पैसे काढू शकता.
advertisement
7/7
एवढेच नाही तर तुम्हाला एफडी खाते उघडायचे असेल किंवा बँक स्टेटमेंट काढायचे असेल तर तुम्ही यासाठी बँकिंग सुविधेचा लाभ घेऊ शकता. तथापि, चेक किंवा ड्राफ्ट जमा करण्यासारख्या कामासाठी, तुम्हाला बँक उघडण्याची प्रतीक्षा करावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Janmashtami Bank Holiday: आजपासून सलग तीन दिवस बँक बंद, महाराष्ट्रात काय स्थिती?