TRENDING:

gold silver rate today : गुरुपुष्यामृताचा मुहूर्त, नाशकात चांदीने गाठला 1 लाखाचा टप्पा, तर सोनेही 80 हजारांवर

Last Updated:
हिंदू धर्मात विविध मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने खरेदी केले जातात. आज गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर अनेक नागरिक सोने व चांदी खरेदी करता. मात्र, आजचा सोने-चांदीचा भाव नेमका काय आहे, हेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
1/5
गुरुपुष्यामृताचा मुहूर्त, नाशकात चांदीने गाठला 1 लाखाचा टप्पा, तर सोनेही 80 हजार
मागील गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. नाशिक सुवर्णपेठेत पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे चांदीने विना जीएसटी एक लाखाचा टप्पा गाठला आहे. सोबतच सोन्याचे दरही 80 हजाराच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना सोनं चांदी खरेदी करणे मुश्किल झाले आहे.
advertisement
2/5
दिवाळी व त्यानंतरच्या लग्नसराईच्या तोंडावर देशातील सराफा बाजारात जोरदार तेजी दिसून येत आहे. बुधवारी नाशिक सराफा बाजारात 24 कॅरेट सोने दरात एकाच दिवशी प्रति 10 ग्रॅममागे 800 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे आज गुरुवारी सकाळी सोन्याचा दर 79,500 वर (जीएसटीसह 81,885 रु.) पोहोचले. गेल्या 6 दिवसांत सोने तब्बल दीड हजार रुपयांनी महागले आहे.
advertisement
3/5
तर चांदीने मात्र एका दिवसात 1 हजार रुपयांची उसळी घेतली. यामुळे चांदीने आजवरचा उच्चांकी दर गाठला आहे. प्रथमच चांदीचा दर विना जीएसटी 1 लाख रुपयांवर गेला तर जीएसटीसह 1 लाख 3 हजारांवर पोहोचला.
advertisement
4/5
22 कॅरेट सोने दरातही नाशिक सराफा बाजारात बुधवारी प्रति 10 ग्रॅममागे 734 रुपयांची वाढ झाली. मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव 72, 144 रुपये होता. तो बुधवारी 72,878 रुपये झाला.
advertisement
5/5
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार देशात या वर्षी सोन्याच्या भावात 24.42 टक्के वाढ झाली आहे. तर चांदी सरासरी 35 टक्के महागली आहे, असे सांगण्यात आले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
gold silver rate today : गुरुपुष्यामृताचा मुहूर्त, नाशकात चांदीने गाठला 1 लाखाचा टप्पा, तर सोनेही 80 हजारांवर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल