SMS अलर्टसाठी बँक ग्राहकांकडून वसूल करणार पैसे, तुमचं तर अकाउंट या बँकेत नाही?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
कोटक महिंद्रा बँकेने एसएमएस अलर्टसाठी शुल्क जाहीर केले असून ३० नंतर प्रत्येक एसएमएससाठी ०.१५ पैसे आकारले जातील. डेबिट कार्ड शुल्कही कमी करण्यात आले आहे.
advertisement
1/5

कोटक महिंद्रा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. बँकेकडून आता एसएमएस अलर्टसाठी शुल्क आकारले जाणार आहे. बँकेने स्पष्ट केले आहे की, हा निर्णय कामकाजावरील खर्च भरून काढण्यासाठी घेण्यात आला आहे. मात्र, याचसोबत ग्राहकांना वेळेत खात्याशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी बँक कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
advertisement
2/5
कोटक महिंद्रा बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ग्राहकांना दरमहा ३० एसएमएस अलर्ट पूर्णपणे मोफत मिळतील. पण, जर एखाद्या ग्राहकाला महिन्याभरात ३० पेक्षा जास्त एसएमएस अलर्ट मिळाले, तर त्यानंतरच्या प्रत्येक एसएमएससाठी ०.१५ पैसे शुल्क आकारले जाईल. याचा अर्थ, ३० एसएमएसच्या मर्यादेनंतर येणाऱ्या प्रत्येक नवीन एसएमएसवर ग्राहकांना हे शुल्क भरावे लागेल.
advertisement
3/5
हे शुल्क प्रामुख्याने युपीआय , एनईएफटी , आरटीजीएस आणि आयएमपीएस ट्रान्सफर्स तसेच एटीएममधून पैसे काढणे, रोख व्यवहारांवर, चेक जमा करणे आणि डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या वापरावर मिळणाऱ्या एसएमएस अलर्टवर लागू होईल.
advertisement
4/5
ज्या ग्राहकांच्या बचत किंवा पगार खात्यात १०,००० रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम शिल्लक असेल, अशा ग्राहकांना मात्र ३० पेक्षा जास्त मासिक एसएमएस अलर्ट मिळाले तरी कोणतेही शुल्क (फीस) भरावे लागणार नाही. ही अट पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना एसएमएस अलर्ट मोफत मिळणे सुरूच राहील.
advertisement
5/5
ग्राहकांना एक दिलासा देणारी बातमी म्हणजे, बँकेने डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क आणि ते जारी करण्याचे शुल्क कमी केले आहे. हे नवे दर १ नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत. यानुसार, 'Privy League Black Metal Debit' कार्डवरील वार्षिक शुल्क ५,००० रुपयांवरून कमी करून १,५०० रुपये करण्यात आले आहे. तसेच, 'Privy League LED Debit' कार्डवरही बँक आता २,५०० रुपयांऐवजी १,५०० रुपये शुल्क आकारणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
SMS अलर्टसाठी बँक ग्राहकांकडून वसूल करणार पैसे, तुमचं तर अकाउंट या बँकेत नाही?