Ladki Bahin Yojana: 'या' तारखेला खात्यावर येणार पैसे? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Ladki Bahin Yojana: 2100 रुपयांसाठी काही नियम आणखी कडक केले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
advertisement
1/6

आता सहावा हप्ता कधी येणार, किती रुपये येणार? किती तारखेपर्यंत येईल याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील महिला करत आहेत. जुलै महिन्यापासून लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये लाडकी बहीण योजनेंतर्गत पैसे देते.
advertisement
2/6
पहिला आणि दुसरा हप्ता एकत्र जमा करण्यात आला. 3000 रुपये खात्यावर भाऊबीजआधी जमा करण्यात आले होते. त्यानंतर चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र जमा करण्यात आला. आता सहवा हप्ता कधी येणार अशी चर्चा सुरू आहे.
advertisement
3/6
5 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा पार पडला आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार साधरणपणे 15 डिसेंबरपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठक होईल आणि सहावा हप्ता देण्यात येईल. याबाबत हिवाळी अधिवेशनात देखील महत्त्वपूर्ण घोषणा होण्याची शक्यता आहे.
advertisement
4/6
लाडकी बहीण योजनेंतर्गत सहावा हप्ता 1500 रुपयेच येणार आहे. 2100 रुपयांसाठी महिलांना बजेटपर्यंत वाट पाहावी लागू शकते असं अदिती तटकरे आणि मुनगंटीवार यांनी संकेत दिले आहेत.
advertisement
5/6
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्क्रूटिनी लावून ज्या महिला निकषात बसत नाहीत त्यांचे अर्ज बाद केले जातील असं म्हटलं होतं. तर अदिती तटकरे यांनी अर्जाची पुन्हा उलटपडताळणी होणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे आता नेमकं महिलांमध्येही थोडा संभ्रम आहे.
advertisement
6/6
सहावा हप्ता खात्यावर येईल तेव्हा नेमकं अर्जांची उलटपडताळणी झाली का ते समजेल, 2100 रुपयांसाठी काही नियम आणखी कडक केले जाण्याची शक्यता असल्याचे संकेत नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki Bahin Yojana: 'या' तारखेला खात्यावर येणार पैसे? लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट