TRENDING:

Ladki Bahin Yojana: निवडणुकीनंतर पहिला धक्का, पुण्यात 10 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र

Last Updated:
Ladki Bahin Yojana 6th installment date: आणखी काही अर्जांची पडताळणी होणार, यामध्ये निकषात न बसणारे अर्ज बाद होण्याची शक्यता, 15 डिसेंबरनंतर सहावा हप्ता खात्यावर येणार असल्याची चर्चा
advertisement
1/7
निवडणुकीनंतर पहिला धक्का, पुण्यात 10 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र
अभिजित पोते, प्रतिनिधी पुणे: पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेंत आतापर्यंत 10 हजार बहिणीचे अर्ज अपात्र ठरले आहेत. त्यांना या योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. लाडक्या बहिणीचा एकही हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही.
advertisement
2/7
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी सुरू करण्यात आली आहे. निकषात न बसणारे अर्ज बाद केले जात आहेत. त्यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
advertisement
3/7
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शपथविधीनंतरच पुन्हा उलटतपासणी करून निकष आणखी कठोर करण्याचे संकेत दिले होते. पुणे जिल्ह्यातील 20 लाख 84 हजार अर्जदारांना योजनेचा लाभ झाल्याची महिला बालकल्याण विभागाची माहिती समोर आली आहे.
advertisement
4/7
योजनेसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत जिल्ह्यातून 21 लाख 11 हजार 363 मंजूर करण्यात आले होते. बाकी अर्जाची छाननी बाकी होती.अजूनही 12 हजार अर्जाची छाननी बाकी आहे.
advertisement
5/7
आत्तापर्यंत 9 हजार 814 अर्ज त्रुटीमुळे अपात्र ठरले आहेत तर 5 हजार 814 अर्जमध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते नाकारण्यात आले आहेत. पुणे शहरात 6 लाख 82 हजार 55 आले. त्यातील 6 लाख 67 हजार 40 अर्ज मंजूर झाले.तर 3 हजार 494 अर्ज अपात्र ठरले आहेत.
advertisement
6/7
जिल्ह्यात सर्वात जास्त हवेली तालुक्यात सर्वात जास्त अर्ज आले. 4 लाख 19 हजार 859 अर्ज आले तर त्यातील 4 लाख 15 हजार 510 अर्ज मंजूर करण्यात आले. यातील 1 हजार 166 अर्ज अपात्र ठरले आहे.
advertisement
7/7
जिल्ह्यात एकूण 21 लाख 11 हजार 946 अर्ज आले त्यातील 20 लाख 84 हजार 364 अर्ज मंजूर झाले. तर 9 हजार 814 अर्ज अपात्र ठरले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki Bahin Yojana: निवडणुकीनंतर पहिला धक्का, पुण्यात 10 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज अपात्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल