TRENDING:

Ladki Bahin Yojana Installment: ठरलं! या तारखेला खात्यावर जमा होणार पैसे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती

Last Updated:
Ladki Bahin Yojana 6th installment date: लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरू होती. डिसेंबरचा तिसरा आठवडा संपत आला तरी पत्ता नव्हता. मकर संक्रांतीदरम्यान दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी चर्चा होती. मात्र त्याला देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पूर्ण विराम दिला आहे.
advertisement
1/7
'या' तारखेला लाडकी बहीण योजनेचे मिळणार पैसे, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती
लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरू होती. डिसेंबरचा तिसरा आठवडा संपत आला तरी पत्ता नव्हता. मकर संक्रांतीदरम्यान दोन्ही हप्ते एकत्र येतील अशी चर्चा होती. मात्र त्याला देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पूर्ण विराम दिला आहे.
advertisement
2/7
देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता कधी मिळणार हे अधिवेशनात सांगितलं. त्यानंतर लाभार्थी महिलांचा जीव भांड्यात पडला. याशिवाय स्क्रूटनी आणि निकषांमधील बदलावर देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं.
advertisement
3/7
आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही. सहावा हप्ता याच महिन्यात मिळणार, अधिवेशन संपल्यानंतर खात्यावर पैसे येणार, अधिवेशनातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य.
advertisement
4/7
अधिवेशन संपल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता खात्यावर जमा होणार आहे. 23 डिसेंबरपासून लाडक्या बहिणीचे पैसे जमा व्हायला सुरुवात होतील अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
advertisement
5/7
बहिणींच्या नावे काही भावांनी खाती उघडली आहेत, ते लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारत आहेत. त्यांनाही अधिवेशनातून देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला आहे.
advertisement
6/7
लाडकी बहीण योजनेचे निकष तूर्तास तरी बदलण्यात येणार नाहीत असं फडणवीस यांनी स्वत: अधिवेशनात सांगितलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
advertisement
7/7
लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये खात्यावर जमा होतात. बजेट 2025 नंतर ही रक्कम वाढून 2100 रुपये करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Ladki Bahin Yojana Installment: ठरलं! या तारखेला खात्यावर जमा होणार पैसे, मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल