TRENDING:

आता 25 दिवसांनंतर होणार नाही LPG गॅस बुकिंग! मग किती दिवसांनी होईल? घ्या जाणून

Last Updated:
LPG Booking New Rule: घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंगच्या नियमात सरकारने मोठा बदल केला आहे. याचा थेट परिणाम हा तुमच्या आमच्यासारख्या सामान्य यूझर्सवर होणार आहे. चला पाहूया कोणता नियम बदलला...
advertisement
1/8
आता 25 दिवसांनंतर होणार नाही LPG गॅस बुकिंग! मग किती दिवसांनी होईल? घ्या जाणून
सरकारकडून बुकिंगचा कालावधी म्हणजेच बुकिंग सायकलमध्ये मोठा बदल केलाय. ग्रामीण भागातील यूझर्सला पूर्वी प्रत्येक 25 दिवसात सिलेंडर बुक करण्याची सुविधा होती. आता ती वाढवून 45 दिवस करण्यात आली आहे. म्हणजेच आता गावात राहणारे लोकं आपलं सिलेंडर बुक केल्यानंतर थेट 45 दिवसांनंतर दुसरं सिलेंडर बुक करू शकतील. याचा साधा अर्थ असा की, तुम्हाला एक सिलेंडर किंमान 45 दिवस चालवावं लागेल.
advertisement
2/8
शहरी यूझर्ससाठीही एलपीजी बुकिंग सायकलमध्ये बदल करण्यात आला आहे. पूर्वी येथे दोन सिलेंडर बुकिंग दरम्यानचा कालावधी 21 दिवस होता. आता तो वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. बुकिंग सायकल वाढवण्यामागे सरकारचा एकच उद्देश आहे की, साठवणूक थांबवी.
advertisement
3/8
पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी नुकतीच प्रेस कॉन्फ्रेंस घेतली. यामध्ये त्या म्हणाल्या की, हार्मुज जलडमरूमध्ये सुरु असलेल्या वादामुळे गॅसच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयात करतो. यामुळे समुद्री मार्गामध्ये आलेल्या अडथळ्यांचा थेट परिणाम आपल्या घरगुती कोट्यावर पडतोय. सरकारने स्पष्ट केलेय की, हा 45 दिवसांचा नियम सध्या एक अस्थायी व्यवस्था आहे.
advertisement
4/8
मंत्रालयाने म्हटलेय की, लोक भितीमुळे गरजेपेक्षा जास्त सिलेंडर बुक करत आहेत. पॅनिक होऊन खरेदी केल्याने वितरण केंद्रांवर दबाव वाढलाय. या विनाकारण होणाऱ्या गर्दी आणि बुकिंगवर कंट्रोल करण्यासाठी सरकारने बुकिंगचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन स्टॉकचं संतुलन कायम राहील.
advertisement
5/8
19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची उपलब्धता वाढवण्यासाठी तेल कंपन्यांना राज्य सरकारांसोबत काम करण्याचे आदेश देण्यात आलेय. औद्योगिक आणि व्यावसायिक आस्थापनांना आता त्यांच्या सरासरी मासिक गरजांच्या 20 टक्के अनिवार्य कोटा देण्यात येईल. ज्यामुळे हॉटेल्स आणि लघु उद्योगांना थोडा-फार आधार मिळू शकेल.
advertisement
6/8
स्वयंपाकाच्या गॅसवर पडणारे ओझं कमी करण्यासाठी सरकारने पर्यायी इंधन मह्णजेच केरोसिनचे वितरणही वेगाने करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी वाटप केलेल्या 1 लाख किलोलिटर केरोसिन व्यतिरिक्त, आता 48,000 किलोलिटरचा नवीन कोटा राज्यांना पाठवला जात आहे.
advertisement
7/8
इंधनाचं संकट पाहता, पर्यावरण मंत्रालयाने नियमांमध्ये सूट देत हॉटेल आणि ढाब्यांना एक महिन्यासाठी मोठा दिलासा दिलाय. आता हॉटेल आणि व्यावसायिक अन्न शिजवण्यासाठी कोळशा आणि केरोसिनसारख्या इंधनाचा उपयोग करु शकतील. ज्यावर सामान्य दिवसात प्रदूषण नियंत्रणामुळे बंद असते.
advertisement
8/8
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांना देशाला विश्वास दिला की, पेट्रोल, डिझेल आणि केरोसिनचा परिपूर्ण साठा उपलब्ध आहे. यामुळे घाबरण्याची गरज नाही. त्यांनी लोकसभेत माहिती दिली की, देशांतर्गत रिफायनरीजना उत्पादन वाढवण्याचे निर्देश देण्यात आले होते. ज्याचा परिणाम म्हणून एलपीजी उत्पादनात 28 टक्केपर्यंत वाढ नोंदवण्यात आली आहे. सरकार मानते की, देशांतर्गत उत्पादन वाढणे आणि बुकिंग नियमांत बदलामुळे बाजारात लवकरच स्थिरता परतेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
आता 25 दिवसांनंतर होणार नाही LPG गॅस बुकिंग! मग किती दिवसांनी होईल? घ्या जाणून
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल