Market Prediction: 8 डिसेंबरला शेअर बाजार ओपन होण्याआधी...; गुंतवणूकदारांसाठी Hot List तयार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Stocks To Watch: शुक्रवारी बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांकडून मोठे प्रोजेक्ट, गुंतवणूक आणि नियामक अपडेट्स जाहीर झाले असून सोमवारी मार्केट उघडताच या शेअर्समध्ये जोरदार हालचाल दिसण्याची शक्यता आहे. इन्फ्रा, बँकिंग, एव्हिएशन आणि बायोटेक सेक्टरमध्ये गुंतवणूकदारांची नजर आता या महत्त्वाच्या घोषणांकडे लागली आहे.
advertisement
1/15

शुक्रवार 5 डिसेंबर रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर अनेक कंपन्यांशी संबंधित मोठ्या घोषणांमुळे सोमवार 8 डिसेंबर रोजी मार्केट उघडताच या शेअर्समध्ये जोरदार हालचाल दिसू शकते.
advertisement
2/15
Ashoka Buildcon अशोका बिल्डकॉन लिमिटेडला BMC (बृहन्मुंबई नगरपालिका) कडून मोठा वर्क ऑर्डर मिळाला आहे. कंपनीने एक्स्चेंजला सांगितले की सायन–पनवेल हायवेवरील टी-जंक्शन फ्लायओव्हर प्रोजेक्टसाठी 447.21 कोटींचा अतिरिक्त वर्क ऑर्डर देण्यात आला आहे. हा ऑर्डर विद्यमान प्रोजेक्टमधील आर्म-1 आणि आर्म-2 फ्लायओव्हर बांधकाम या घटकांतर्गत आहे.
advertisement
3/15
PNB – Punjab National Bank PNB ने Repo Linked Lending Rate (RLLR) मध्ये बदल केला आहे. नवीन RLLR 8.35% वरून 8.10% करण्यात आली असून ती 6 डिसेंबर 2025 पासून लागू होईल. मात्र MCLR आणि Base Rate मध्ये कोणताही बदल केलेला नाही, असे बँकेने स्पष्ट केले.
advertisement
4/15
Biocon बायोकॉनने जाहीर केले की ती आपल्या सब्सिडियरी Biocon Biologics चे पूर्णपणे इंटीग्रेशन करणार आहे. शेअर स्वॅपद्वारे उर्वरित हिस्सेदारीचे अधिग्रहण केले जाईल, ज्याची एकूण किंमत सुमारे 550 कोटी डॉलर्स आहे. हा इंटीग्रेशन प्रोसेस 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा असून बायोकॉन बोर्डाने स्वॅप रेश्यो आणि QIP मार्फत 4,500 कोटी रुपये उभारण्यास मंजुरी दिली आहे.
advertisement
5/15
CEAT कंपनीने 250 कोटी पर्यंतच्या अनसिक्योर्ड NCDs जारी करण्यास मान्यता दिली आहे. त्यासोबतच इंडोनेशियातील सब्सिडियरी PT CEAT Tyres Indonesia मध्ये IDR 3800 मिलियन गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. CEAT चा शेअर शुक्रवारच्या सत्रात 0.39% वाढीसह 3,904 वर बंद झाला.
advertisement
6/15
Fino Payments Bank RBI ने Fino Payments Bank ला Small Finance Bank मध्ये रूपांतर करण्यास सैद्धांतिक मंजुरी दिली आहे. ही मंजुरी मिळवणारे Fino हे पहिलेच पेमेंट्स बँक आहे. कंपनीने ऑक्टोबर–डिसेंबर 2023 मध्ये SFB परवान्यासाठी अर्ज केला होता.
advertisement
7/15
GR Infraprojects कंपनीने स्टेट हायवेज अथॉरिटी ऑफ झारखंड बरोबर गिरीडीह बायपास (टुंडी दिशेने) मार्गासाठी EPC करार केला आहे. हा प्रकल्प 26.672 किमी लांबीचा असून 290.23 कोटी किमतीचा आहे. हा प्रकल्प Appointed Date पासून 24 महिन्यांत पूर्ण करायचा आहे.
advertisement
8/15
Kesoram Industries कंपनीत Frontier Warehousing Ltd. हे नवीन प्रोमोटर म्हणून आले असून बिड़ला ग्रुपचे Kesoram शी असलेले जुने नाते संपुष्टात येत आहे. फ्रंटियरने 26% हिस्सेदारी (8.07 कोटी शेअर्स) प्रत्येकी 5.48 या किमतीवर विकत घेण्यासाठी ओपन ऑफरची घोषणा केली आहे.
advertisement
9/15
MTAR Technologies MTAR Technologies ला Megha Engineering and Infrastructures Ltd. कडून 194 कोटींचा ऑर्डर मिळाला आहे. हा ऑर्डर Civil Nuclear Power Sector साठी एंड फिटिंग्स आणि संबंधित घटकांच्या पुरवठ्यासाठी आहे.
advertisement
10/15
Patanjali Foods भारत–रशिया वार्षिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पतंजली आयुर्वेदने रशियन सरकारसोबत वेलनेस आणि स्किल्ड लेबर कोऑपरेशन एग्रीमेंट साइन केले आहे. या करारामुळे दोन्ही देशांतील व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
11/15
SPML Infra SPML Infra ला राजस्थानातील झालावाडमध्ये PHED कडून GSTसह 207.38 कोटींचा वॉटर सप्लाय प्रोजेक्ट प्राप्त झाला आहे. हा Jal Jeevan Mission अंतर्गत नोनेरा वॉटर सप्लाय प्रोजेक्टचा भाग आहे.
advertisement
12/15
IndiGo DGCA ने इंडिगोचे CEO पीटर एल्बर्स यांना कारण दाखवा नोटीस जारी केली आहे. प्रवाशांना झालेल्या अडचणी आणि ऑपरेशनल फेल्युअर्समुळे DGCA ने स्पष्ट केले आहे की समाधानकारक उत्तर न दिल्यास मोठा दंड आकारला जाईल. नोटीसला उत्तर देण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.
advertisement
13/15
Cochin Shipyard Cochin Shipyard कोचीन शिपयार्डला डेन्मार्कच्या Svitzer कंपनीकडून अॅडव्हान्स इलेक्ट्रिक टोइंग वेसल्स (Transverse Tugs) बांधण्याचा मोठा ऑर्डर मिळाला आहे. हा करार 250–₹500 कोटी मूल्याच्या ‘Significant’ श्रेणीतील असल्याचे कंपनीने सांगितले.
advertisement
14/15
Lenskart Solutions 8 डिसेंबर रोजी LensKart चा 1-महिन्याचा लॉक-इन कालावधी संपत असल्याने मोठी ट्रेडिंग अ‍ॅक्टिव्हिटी दिसू शकते. एकूण 40.7 दशलक्ष शेअर्स (एकूण 2%) विक्रीसाठी उपलब्ध होणार असून त्यांची किंमत 1701 कोटी इतकी आहे.
advertisement
15/15
सोमवारी मार्केटमध्ये मोठी ब्लॉक डील होऊ शकते. Eternal Ltd मधील संस्थात्मक गुंतवणूकदार आपला हिस्सा विकण्याची शक्यता आहे. ही डील कंपनीच्या एकूण इक्विटीच्या 0.5% इतकी असू शकते, ज्याची अंदाजे किंमत 1500 कोटी आहे. यासाठी 289.5 प्रति शेअर फ्लोर प्राइस ठरवण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Market Prediction: 8 डिसेंबरला शेअर बाजार ओपन होण्याआधी...; गुंतवणूकदारांसाठी Hot List तयार