Railway Ticket Guidelines : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट; मोबाईलवर तिकिट आता Unvalid; प्रवास करताना Print Ticket हवंच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
अगदी चहाच्या टपरीपासून ते मॉलपर्यंत आपण मोबाइलवरून 'स्कॅन' करून पैसे देतो आणि रेल्वे प्रवासासाठी 'UTS' ॲपवरून तिकीट काढतो. टीसी (TC) आल्यावर आरामात मोबाइल दाखवून आपण प्रवास करतो. पण, प्रवाशांच्या याच सवयीला आता भारतीय रेल्वेने मोठा झटका दिला आहे.
advertisement
1/10

आजच्या डिजिटल युगात आपल्या खिशात पाकीट असो वा नसो, मोबाइल हा असतोच. त्यामुळे आता पैसे घरी राहिले किंवा कोणती एखादी गोष्ट आणायला विसरलो, घरी राहिली तरी आपण ती फोनवर मागवू शकतो. अगदी चहाच्या टपरीपासून ते मॉलपर्यंत आपण मोबाइलवरून 'स्कॅन' करून पैसे देतो आणि रेल्वे प्रवासासाठी 'UTS' ॲपवरून तिकीट काढतो. टीसी (TC) आल्यावर आरामात मोबाइल दाखवून आपण प्रवास करतो. पण, प्रवाशांच्या याच सवयीला आता भारतीय रेल्वेने मोठा झटका दिला आहे.
advertisement
2/10
जर तुम्ही जनरल तिकीट काढून प्रवास करत असाल आणि टीसीला मोबाइलवर तिकीट दाखवण्याच्या विचारात असाल, तर सावधान! रेल्वेच्या एका नवीन निर्णयामुळे तुमची ही सवय तुम्हाला 'विनातिकीट' प्रवाशांच्या रांगेत उभी करू शकते. नेमकं काय आहे हे नवीन धोरण आणि रेल्वेला हा कठोर निर्णय का घ्यावा लागला, जाणून घेऊया.
advertisement
3/10
भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी डिजिटल क्रांती केली असली, तरी आता त्यात काही महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, अनारक्षित (Unreserved) तिकीट घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता मोबाइलवर तिकीट दाखवून चालणार नाही. तुमच्याकडे त्या तिकिटाची प्रत्यक्ष कागदी प्रत (Print Copy) असणे बंधनकारक आहे. जर तुम्ही मोबाइलवर तिकीट दाखवले, तर ते ग्राह्य धरले जाणार नाही आणि तुम्हाला दंड भरावा लागेल.
advertisement
4/10
रेल्वेला हा निर्णय का घ्यावा लागला?तंत्रज्ञान जसं फायद्याचं आहे, तसं ते फसवणुकीसाठीही वापरलं जात आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं आहे की, Artificial Intelligence (AI) आणि प्रगत फोटो एडिटिंग टूल्सचा वापर करून काही लोक हुबेहूब दिसणारी बनावट तिकिटे तयार करत आहेत.
advertisement
5/10
नुकतीच जयपूर मार्गावर एक धक्कादायक घटना घडली. तिकीट तपासणी दरम्यान काही विद्यार्थ्यांकडे मोबाइलवर तिकिटे होती. विशेष म्हणजे, त्या तिकिटांवरील QR Code देखील यशस्वीरित्या स्कॅन होत होता आणि भाड्याचा तपशीलही योग्य दिसत होता. मात्र, खोलवर तपास केल्यावर समजले की, ती तिकिटे AI च्या मदतीने बनवलेली बनावट तिकिटे होती. अशा प्रकारच्या फसवणुकीमुळे रेल्वेच्या महसुलाचं मोठं नुकसान होत आहे आणि सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
advertisement
6/10
रेल्वेने सर्वच तिकिटांसाठी प्रिंट अनिवार्य केलेली नाही. त्यामुळे गोंधळून जाऊ नका, नीट समजून घ्या:यांना मोबाइलवर तिकीट दाखवण्याची मुभा आहे:आरक्षित ई-तिकीट (Reserved E-Ticket): आयआरसीटीसी (IRCTC) वरून बुक केलेली कन्फर्म किंवा वेटिंग तिकिटे.MT-CUT तिकिटे: या प्रकारच्या डिजिटल तिकिटांना नियमातून सवलत आहे.
advertisement
7/10
आता टीटीई (TTE) आणि टीसी (TC) यांच्या मोबाईल आणि टॅब्लेटमध्ये एक खास 'टीटीई ॲप' इन्स्टॉल केले जात आहे. प्रवाशाच्या तिकिटावर संशय आल्यास, क्यूआर कोड स्कॅन करून युटीएस (UTS) नंबर आणि कलर कोडची तपासणी केली जाईल. यामुळे तिकीट खरे आहे की बनावट, हे तात्काळ स्पष्ट होईल. रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अनारक्षित (General) तिकिटाची कागदी प्रत (Physical Copy) सोबत ठेवणे आता अनिवार्य आहे. त्याचबरोबर, भविष्यातील कोणतीही फसवणूक टाळण्यासाठी तिकीट दलालांवरही करडी नजर ठेवली जात आहे.
advertisement
8/10
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी?रेल्वे विभाग आता आपली प्रणाली अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी 'आधार प्रमाणीकरण' (Aadhaar Authentication) देखील अनिवार्य करत आहे. जर तुम्ही जनरल तिकीट काढून प्रवास करणार असाल, तर ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी रेल्वे स्टेशनवरील मशीन किंवा काउंटरवरून आपल्या तिकिटाची प्रिंट नक्की घ्या.
advertisement
9/10
डिजिटल तिकिटांच्या नावाखाली होणारी फसवणूक रोखण्यासाठी आणि आपला प्रवास कायदेशीररित्या सुखकर करण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे पुढच्या वेळी प्रवासाला निघताना फक्त मोबाइल चार्ज असून चालणार नाही, तर खिशात तिकिटाचा कागदही हवा.
advertisement
10/10
UTS वापरुन किंवा लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी हा नियम सध्या तरी लागू झालेला नाही किंवा रेल्वेची याबद्दलची अजूनतरी कोणती अपडेट नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Railway Ticket Guidelines : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट; मोबाईलवर तिकिट आता Unvalid; प्रवास करताना Print Ticket हवंच