TRENDING:

नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, ३१ मार्चआधी करा 5 कामं नाहीतर भरावा लागणार जास्त Income Tax

Last Updated:
१ एप्रिलपासून क्रेडिट कार्ड नियम कडक Income Tax Rules 2026 नुसार उच्च खर्चाची माहिती आयकर विभागाला जाईल आणि PAN लिंक अनिवार्य होणार.
advertisement
1/6
नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, ३१ मार्चआधी करा 5 कामं नाहीतर भरावा लागणार जास्त Income Tax
आजकाल सिबिल स्कोअर वाढवण्यासाठी क्रेडिट कार्डचा जास्त वापर करण्याचा एक ट्रेण्ड आला आहे. ज्यात जास्त क्रेडिट कार्ड वापरून नंतर ते पैसे फेडायचे ज्यामुळे पैसे वापरायला मिळतात आणि त्यासोबत सिबिल स्कोअर देखील मेंटेन राहातो. ११ कोटींहून अधिक क्रेडिट कार्ड धारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. १ एप्रिलपासून काही नियम बदलणार आहेत. हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकतं.
advertisement
2/6
Income Tax Rules 2026 नव्या नियमानुसार आता तुमचे उत्पन्न आणि क्रेडिट कार्डवर होणारा खर्च यांचा मेळ बसणं अनिवार्य आहे. जर तुमचं उत्पन्न कमी आणि क्रेडिट कार्डचं बिल लाखांच्या घरात असेल, तर आयकर विभागाकडून तुम्हाला नोटीस पाठवू शकतं.
advertisement
3/6
नव्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने एका आर्थिक वर्षात क्रेडिट कार्डद्वारे १० लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे व्यवहार केले, तर बँका त्याची माहिती आयकर विभागाला दिली जाईल. विशेषतः परदेशातील खर्च आणि १ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहारांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.
advertisement
4/6
तुमचा खर्च तुमच्या आयटीआरमध्ये दर्शवलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त आढळल्यास, तुम्हाला उत्पन्नाचा स्रोत स्पष्ट करावा लागेल.१ एप्रिलपासून पॅन कार्डशिवाय नवीन क्रेडिट कार्ड मिळणं अशक्य होणार आहे. इतकंच नाही, तर जुनी कार्ड्सही पॅनशी लिंक करणं बंधनकारक असेल.
advertisement
5/6
यामुळे तुमचे सर्व आर्थिक व्यवहार थेट टॅक्स रेकॉर्डशी जोडले जातील. एक दिलासादायक बाब म्हणजे, जर तुमचं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट ३ महिन्यांपेक्षा जुनं नसेल, तर पॅन कार्ड काढताना तुम्ही त्याचा वापर अॅड्रेस फ्रूफ म्हणून करू शकाल.
advertisement
6/6
आतापर्यंत तुम्ही डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगने टॅक्स भरत होतात, पण आता तुम्ही क्रेडिट कार्डने Income Tax भरू शकता. सरकारने याला अधिकृत इलेक्ट्रॉनिक पेमेंट मोड म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे टॅक्स भरणं सोपं होणार असलं, तरी बँका यावर प्रोसेसिंग फी आकारू शकतात, हे लक्षात ठेवावे लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
नोकरदारांसाठी महत्त्वाची बातमी, ३१ मार्चआधी करा 5 कामं नाहीतर भरावा लागणार जास्त Income Tax
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल