TRENDING:

3000 रुपयांचा Fastag पास कधी मिळणार? केंद्रीय मंत्री गडकरींनी तारीखच सांगितली

Last Updated:
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फास्ट टॅगसाठी 3000 रुपयांचा वार्षिक पास लाँच केला आहे. या योजनेमुळे 200 ट्रिप्स करता येतील आणि टोल भरण्याची गरज नाही. योजना 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होईल.
advertisement
1/6
3000 रुपयांचा Fastag पास कधी मिळणार? केंद्रीय मंत्री गडकरींनी तारीखच सांगितली
फास्ट टॅगसाठी आता सारखं रिचार्ज मारण्याची गरज नाही. तुम्ही एकदाच रिचार्ज करुन वर्षभर प्रवास करू शकता. केंद्र सरकारने याबाबत नवीन स्कीम आणली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली.
advertisement
2/6
फास्ट टॅगसंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे. 3000 रुपये भरुन तुम्ही फास्ट टॅगचा वर्षभरासाठीचा पास काढू शकता. ही योजना खास केंद्र सरकारने लाँच केल्याचं गडकरींनी ट्विट करुन सांगितलं आहे. या योजनेमुळे कोट्यवधी ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.
advertisement
3/6
राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर हा पास वापरता येणार आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर तुम्हा 200 फेऱ्या मारु शकणार आहात. 3000 रुपयांचा पास एकदाच काढून तुम्ही वर्षभर टोल न भरता फिरू शकता. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे.
advertisement
4/6
केंद्र सरकारने फास्ट टॅगवर आधारीत एक स्कीम लाँच केली आहे. यामध्ये 3000 रुपयांचा पास काढून तुम्ही टोल भरण्याच्या कटकटीपासून वाचू शकता. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. ही योजना संपूर्ण देशात एकाच वेळी लागू करण्यात येणार आहे.
advertisement
5/6
3000 रुपयांमध्ये चालकाला 200 ट्रिप करता येतील अशी अट ठेवण्यात आली आहे. ही योजना नॉन कमर्शियल, खासगी वाहनं, कार, जीप आणि व्हॅनसाठी लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली.
advertisement
6/6
3000 रुपये किंमतीचा फास्ट टॅग पास सुरू करण्यात येणार आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गावर अडथळ्याशिवाय प्रवास सुकर व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
3000 रुपयांचा Fastag पास कधी मिळणार? केंद्रीय मंत्री गडकरींनी तारीखच सांगितली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल