UPI ट्रांझेक्शन करणाऱ्यांनो लक्ष द्या! 1 फेब्रुवारीपासून ब्लॉक केले जाणार हे ट्रांझेक्शन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याबाबत परिपत्रक जारी करून 1 फेब्रुवारीपासून कोणता मोठा बदल होणार आहे याविषयी माहिती दिली आहे. चला त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
1/7

मुंबई : आजकाल UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस द्वारे पेमेंट करणे खूप सामान्य झाले आहे. भाजीच्या स्टॉलपासून ते मोठमोठे मॉल्स आणि दुकानांपर्यंत या माध्यमातून पेमेंट करणे सोपे झाले आहे. तुम्ही देखील UPI द्वारे व्यवहार करत असाल, तर तुम्हाला माहिती असेल की NPCI 1 फेब्रुवारीपासून काही व्यवहार ब्लॉक करणार आहे.
advertisement
2/7
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याबाबत परिपत्रक जारी करून 1 फेब्रुवारीपासून विशेष कॅरेक्टर्सपासून तयार असलेल्या आयडीसह ट्रांझेक्शन स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती दिली आहे.
advertisement
3/7
यूझर्स अल्फान्यूमेरिक वर्ण वापरून तयार केलेल्या आयडीद्वारेच व्यवहार करू शकतील. तांत्रिक वैशिष्ट्यांचे पालन न करणाऱ्यांचे आयडी ब्लॉक केले जातील.
advertisement
4/7
NPCI ने हा निर्णय अशा वेळी घेतला आहे जेव्हा किरकोळ पेमेंट ऑपरेटर्सनी ट्रांझेक्सनसाठी UPI पर्यायाचा वापर वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. 2016 मध्ये नोटाबंदीनंतर भारतात डिजिटल व्यवहार वेगाने उदयास आले आहेत.
advertisement
5/7
या प्रकरणात, भारताच्या नॅशनल पेमेंट्स इंटरफेसने आधीच लोकांना UPI आयडीसाठी विशेष वर्णांऐवजी अल्फान्यूमेरिक वर्ण वापरण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर अनेकांनी ते स्वीकारले, पण तरीही काही यूजर्स ते फॉलो करत नाहीत. आता NPCI याची अंमलबजावणी करण्यासाठी कठोर भूमिका अवलंबणार आहे. जेणेकरून कोणीही UPI ट्रान्झॅक्शन आयडीमध्ये कोणतेही विशेष वर्ण वापरू नये.
advertisement
6/7
केंद्रीय प्रणाली सर्व व्यवहार स्वीकारणार नाही ज्यांच्या UPI आयडीमध्ये स्पेशल व्हर्जन आहे. NPCI ने सर्व बँकिंग संस्थांना याचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्लाही दिला आहे.
advertisement
7/7
UPI द्वारे व्यवहार अगदी सहज केले जातात. त्यामुळे त्याचा वापरही वाढत आहे. डिसेंबर 2024 पर्यंतच, UPI व्यवहारांची संख्या 16.73 अब्जांवर पोहोचून विक्रम प्रस्थापित केली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
UPI ट्रांझेक्शन करणाऱ्यांनो लक्ष द्या! 1 फेब्रुवारीपासून ब्लॉक केले जाणार हे ट्रांझेक्शन