बायकोसोबत मिळून Post Officeमध्ये उघडा 'हे' अकाउंट! दरमहा मिळेल 9250 रुपयांचं फिक्स व्याज
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग्स स्किम या गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जातात. कारण यात कोणतीही रिस्क नसते. फिक्स व्याज मिळतं. आज आपण अशाच एका स्किमविषयी जाणून घेणार आहोत.
advertisement
1/7

Post Office Scheme: सध्याच्या काळात लोकांना सेव्हिंगचं महत्त्व कळालं आहे. अनेक लोक आता खर्चासोबतच सेव्हिंगचाही विचार करतात. पण यावेळी सर्वसामान्य लोकांना जोखिम नको असते. अशावेळी पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग करणे हे बेस्ट ठरते. कारण यावर कोणतीही जोखिम नसते. फिक्स्ड व्याज मिळतं.
advertisement
2/7
पोस्ट ऑफिसमध्ये आपण अनेक प्रकारचे अकाउंट ओपन करु शकतो. ज्यामध्ये आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ, किसान विकासपत्र यांचा समावेश आहे. पोस्ट ऑफिसच्या प्रसिद्ध स्किम्समध्ये मंथली इन्कम स्किमही सामिल आहे. ज्यावर तुम्हाला 7.4 टक्के वार्षिक व्याज मिळतंय.
advertisement
3/7
या स्किममध्ये तुम्हाला फक्त एकदा गुंतवणूक करायची आहे. ज्यानंतर तुम्हाला दरमहा गॅरंटीसह फिक्स व्याज मिळतं. हे व्याज तुम्हाला अकाउंट ओपन केल्यानंतर पुढील 5 वर्षे मिळत राहतं. तुम्ही या स्किममध्ये आपल्या पत्नीसोबत किंवा घरातील कोणत्याही सदस्यासोबत अकाउंट उघडले तर तुम्हाला दरमहा जास्तीत जास्त 9250 रुपये पर्यंत फिक्स्ड व्याज मिळेल.
advertisement
4/7
MIS मध्ये तुम्ही किमान 1000 रुपयांपर्यंत गुंतवणुकीसह अकाउंट ओपन करु शकता. या स्किम अंतर्गत तुम्ही सिंगल आणि जॉइंट, दोन्ही प्रकारचे अकाउंट ओपन करु शकता.
advertisement
5/7
सिंगल अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस स्किम अंतर्गत तुम्ही जॉइंट अकाउंटमध्ये जास्तीत जास्त 3 लोकांना सामिल करु शकता. तुम्ही या स्किममध्ये जॉइंट अकाउंटमध्ये पत्नीसोबत मिळून 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला फक्त व्याजानेच दरमहा मोठी कमाई करता येऊ शकते.
advertisement
6/7
दरमहा मिळेल 9250 रुपयांचा फिक्स व्याज : तुम्ही तुमच्या बायकोसोबत मिळून पोस्ट ऑफिसच्या एमआयएस स्किममध्ये 15 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला दरमहा 9250 रुपयांचं फिक्स व्याज मिळेल. या स्किम अंतर्गत मिळणाऱ्या व्याजाचा पैसा थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केला जातो.
advertisement
7/7
पोस्ट ऑफिसची एमआयएस स्किम 5 वर्षात मॅच्योर होते. मॅच्योरिटीनंतर तुमच्या गुंतवणुकीचे सर्व पैसे तुमच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात. पोस्ट ऑफिसमध्ये एमआयएस अकाउंट ओपन करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिसचं सेव्हिंग्स अकाउंट असणं गरजेचं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
बायकोसोबत मिळून Post Officeमध्ये उघडा 'हे' अकाउंट! दरमहा मिळेल 9250 रुपयांचं फिक्स व्याज