Fastag : फक्त टोल नाही, आता तुमच्या 'फास्टॅग'ने भरा पेट्रोलचे आणि पार्किंगचे पैसे; सरकारची नवी मेगा योजना
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुमच्या गाडीच्या काचेवर लावलेल्या एका साध्या स्टिकरने तुम्ही आता पेट्रोल पंपावर बिल भरू शकणार आहात, इलेक्ट्रिक गाडी चार्ज करू शकणार आहात आणि रेल्वे स्टेशनवर पार्किंगसाठी लागणाऱ्या वादातूनही तुमची सुटका होणार आहे.
advertisement
1/9

रस्त्यावरून प्रवास करताना टोल नाक्यावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी सरकारने फास्टॅग (FASTag) आणलं आणि प्रवासाचा वेग वाढला. पण आता तुमचं हेच फास्टॅग कार्ड टोल नाक्यापुरतं मर्यादित राहणार नाही. लवकरच फास्टॅग हे तुमच्या खिशातील 'स्मार्ट वॉलेट' होणार आहे. तुमच्या गाडीच्या काचेवर लावलेल्या एका साध्या स्टिकरने तुम्ही आता पेट्रोल पंपावर बिल भरू शकणार आहात, इलेक्ट्रिक गाडी चार्ज करू शकणार आहात आणि रेल्वे स्टेशनवर पार्किंगसाठी लागणाऱ्या वादातूनही तुमची सुटका होणार आहे.
advertisement
2/9
केंद्र सरकार यासाठी एक मोठी मल्टीपर्पस योजना घेऊन येत आहे, ज्याची चाचणी (Trial) गेल्या सहा महिन्यांपासून सुरु होती जी आता यशस्वीरीत्या पार पडली आहे. नेमकी ही योजना काय आहे आणि तुमच्या दैनंदिन प्रवासावर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊया सविस्तर.
advertisement
3/9
आता 'या' 7 सुविधांसाठी होणार फास्टॅगचा वापरसडक परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने फिनटेक कंपन्या, बँका आणि टोल ऑपरेटर्ससोबत चर्चा करून फास्टॅगचा वापर खालील सुविधांसाठी करण्यास संमती दिली आहे:
advertisement
4/9
1. पेट्रोल पंप: इंधन भरल्यानंतर आता रोख रक्कम किंवा कार्ड शोधण्याची गरज नाही, थेट फास्टॅगवरून पेमेंट होईल.2. पार्किंग शुल्क: विशेषतः मॉल, विमानतळ आणि रेल्वे स्टेशनवर पार्किंगसाठी याचा वापर होईल.3. ईव्ही चार्जिंग: इलेक्ट्रिक वाहने चार्ज करताना होणारे पेमेंट सोपे होईल4. फूड आउटलेट: महामार्गावरील हॉटेल्समध्ये खाण्यापिण्याचं बिल फास्टॅगने भरता येईल.5. वाहन मेंटेनन्स: गाडीची सर्व्हिसिंग किंवा दुरुस्तीसाठीही याचा वापर करता येईल.6. सिटी एन्ट्री चार्ज: शहरात प्रवेश करताना लागणारा टॅक्स किंवा एन्ट्री फी आपोआप कट होईल.7. इतर प्रवास सुविधा: प्रवासादरम्यान मिळणाऱ्या इतर तांत्रिक सोयींसाठीही फास्टॅग वापरता येईल.
advertisement
5/9
रेल्वे स्टेशनवरील पार्किंगच्या कटकटीतून सुटकादिल्ली रेल्वे मंडळाने यासंदर्भात एक क्रांतीकारी धोरण तयार केले आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर आता पार्किंग शुल्काचे पेमेंट फास्टॅगद्वारे होईल.80 टक्के प्रवासी हे प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी रेल्वे स्टेशनवर येतात. फास्टॅगमुळे पैसे देण्याच्या रांगेत उभे राहावे लागणार नाही, ज्यामुळे जामची समस्या सुटेल.
advertisement
6/9
अनेकदा पार्किंग ठेकेदार ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे वसूल करतात. फास्टॅगमुळे पैसे थेट खात्यातून कट होतील, त्यामुळे वादाला जागा उरणार नाही.पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी प्रथमच 'मार्शल्स' म्हणून माजी सैनिकांची नियुक्ती केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांशी होणारी गैरवर्तणूक थांबेल आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक होईल.
advertisement
7/9
अधिकाऱ्यांच्या मते, फास्टॅगला वॉलेटप्रमाणे वापरल्यामुळे डिजिटल फ्रॉडची शक्यता कमी होईल. युजर्स फास्टॅगमध्ये ठराविक रक्कमच ठेवू शकतात, ज्यामुळे फसवणूक झाली तरी मोठ्या आर्थिक नुकसानीचा धोका कमी होतो.
advertisement
8/9
कधीपासून होणार लागू?दिल्ली मंडळाने यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण केली आहे. नवीन कंपनी 28 डिसेंबरपासून पार्किंग व्यवस्थापनाची जबाबदारी स्वीकारणार आहे. येत्या काही महिन्यांत ही सेवा देशभरातील प्रमुख शहरांमध्ये आणि पेट्रोल पंपांवर सुरू झालेली दिसेल.
advertisement
9/9
फास्टॅगला 'मल्टीपर्पस' बनवण्याचा सरकारचा हा निर्णय डिजिटल इंडियाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे प्रवासादरम्यानची धावपळ कमी होऊन सर्वसामान्यांचा प्रवास अधिक सुखकर आणि पारदर्शक होईल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Fastag : फक्त टोल नाही, आता तुमच्या 'फास्टॅग'ने भरा पेट्रोलचे आणि पार्किंगचे पैसे; सरकारची नवी मेगा योजना