TRENDING:

Post Officeमध्ये 2 लाख जमा केल्यास मिळतं 89,990चं फिक्स व्याज! भारी स्किम एकदा पाहाच

Last Updated:
पोस्ट ऑफिस गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानलं जातं. तुम्हालाही गुंतवणूक करायची असेल तर आज आपण पोस्ट ऑफिसच्या एका भारी स्किमविषयी जाणून घेऊया. ज्यामध्ये तुम्हाला 2 लाखांच्या गुंतवणुकीवर बंपर व्याज मिळतं.
advertisement
1/7
Post Officeमध्ये 2 लाख जमा केल्यास मिळतं 89,990चं फिक्स व्याज! भारी स्किम एकदा पाहाच
Post Office Saving Schemes: पैसे कमावण्यासोबतच पैसे सेव्हिंग करणेही तितकेच गरजेचे असते. कारण अडचणीच्या वेळी हेच पैसे आपल्याला कामी येतात. भारतात काही लोक हे म्यूच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणं पसंत करतात. पण यामध्ये रिस्क असते. अशावेळी अनेक लोकं हे जोखिम नाही अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. तुम्हालाही जोखिम घ्यायची नसेल तर पोस्ट ऑफिसच्या योजना तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतात. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या बचत खात्यांमध्ये गुंतवणूक करू शकता.
advertisement
2/7
पोस्ट ऑफिसच्या काही स्किम देशातील दिग्गज बँकांहून जास्त व्याज देताय. आज आपण पोस्ट ऑफिसच्या टीडी स्किमविषयी जाणून घेऊया. ज्या बंक एफडीप्रमाणेच असतात. एका ठरलेल्या वेळेनंतर गॅरंटीसह फिक्सड व्याजसह तुमचा पूर्ण पैसा परत मिळतो. पोस्ट ऑफिसची टीडी स्किमही तशीच आहे. ज्यामध्ये तुम्ही फक्त 2 लाख रुपये जमा करून 89,990 रुपयांचं फिक्स आणि बंपर व्याज कमवू शकता.
advertisement
3/7
पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही 1 वर्षे, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांच्या कालावधीसाठी एफडी अकाउंट ओपन करू शकता. पोस्ट ऑफिसमध्ये एफडी अकाउंटमध्ये टीडीच्या नावाने ओपन केले जातात. पोस्ट ऑफिसचं टीडी अकाउंट हे बँकांच्या एफडी अकाउंटप्रमाणे असतो. ज्यामध्ये तुम्हाला मॅच्योरिटीवर फिक्स व्याजासह पूर्ण पैसा परत मिळतो.
advertisement
4/7
पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांमध्ये तुमचा पैसा पूर्णपणे सुरक्षित राहतो. कारण हे थेट भारत सरकारच्या कंट्रोलमध्ये असते. पोस्ट ऑफिस 1 वर्षांच्या टीडीवर 6.9 टक्के, 2 वर्षांच्या टीडीवर 7.0 टक्के, 3 वर्षांच्या टीडीवर 7.1 टक्के आणि 5 वर्षांच्या टीडीवर 7.5 टक्क्यांचं व्याज देतेय.
advertisement
5/7
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या टीडी स्किममध्ये 2 लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्योरिटीवर एकूण 2,89,990 रुपये मिळतात. ज्यात 89,990 रुपयांच्या फिक्स व्याजाचा समावेश आहे.
advertisement
6/7
सध्याच्या काळात देशातील कोणतीही बँक 5 वर्षांच्या एफडी स्किमवर 7.5 टक्के व्याज देत नाही. पोस्ट ऑफिसच्या टीडी स्किममध्ये सर्व वयाच्या ग्राहकांना योग्य व्याज मिळते.
advertisement
7/7
बँकांमध्ये वरिष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत 0.50 टक्के जास्त व्याज मिळतं. अनेक बँका 80 वर्षांहून जास्त वयाच्या ग्राहकांना आणखी जास्त व्याज ऑफर करते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Post Officeमध्ये 2 लाख जमा केल्यास मिळतं 89,990चं फिक्स व्याज! भारी स्किम एकदा पाहाच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल