प्रीमियम फ्यूल एवढं महाग का असतं? नॉर्मल पेट्रोलपेक्षा त्यात काय वेगळं? घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आपल्यापैकी अनेकजण नेहमीच इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जातात. काही लोक हे प्रीमियम पेट्रोल भरतात. पण हे सामान्य पेट्रोलपेक्षा काय वेगळं असतं? याविषयी सवस्तर जाणून घ्या.
advertisement
1/7

Petrol Unknown Facts: नियमित वाहन चालवत असणारे नेहमीच पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जातात. यावेळी आपल्याला दोन प्रकारचे ऑप्शन दिसतात, ते म्हणजे नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल. पण या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? खरंतर प्रीमियम पेट्रोलची किंमत ही सामान्यपेक्षा जास्त असतं. मग यात एवढं काय वेगळं असतं? चला जाणून घेऊया.
advertisement
2/7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोलमधील सर्वात मोठं अंतर म्हणजे त्याचे ऑक्टेन रेटिंग असते. ऑक्टेन रेटिंगवरुन कळतं की, इंधन इंजिनमध्ये नॉकिंगला किती प्रभावी पद्धतीने थांबवू शकते.
advertisement
3/7
प्रीमियम पेट्रोलची ऑक्टेन रेटिंग ही जवळपास 91 किंवा त्यापेक्षा जास्त असते. तर नॉर्मल पेट्रोलची रेटिंग ही जवळपास 87 असते. या व्यतिरिक्त प्रीमियम पेट्रोलमध्ये खास प्रकारचे एडिटिव्स मिसळेले असतात. ज्यामुळे इंजिन स्वच्छ ठेवण्यात आणि चांगला परफॉर्मेंस देण्यात मदत मिळते.
advertisement
4/7
याच कारणामुळे प्रीमियम पेट्रोलची किंमत ही सामान्य पेट्रोलपेक्षा जास्त असते. प्रीमियम पेट्रोलमध्ये खास प्रकारे एडिटिव्स आणि डिटर्जेट मिसळले जातात. ज्यामुळे इंजिनमध्ये कार्बन जमा होत नाही आणि ते घाणही होत नाहीत.
advertisement
5/7
सामान्य पेट्रोलमध्ये असे कोणतेच तत्व नसतात. म्हणूनच प्रीमियम पेट्रोलचा वापर केल्यास इंजिनमध्ये नॉकिंगची शक्यता कमी होते. इंजिन स्मूद पद्धतीने काम करतं.
advertisement
6/7
प्रीमियम पेट्रोल हे हाय-परफॉर्मेंस आणि जास्त कंप्रेशनच्या इंजिनसाठी उपयुक्त ठरतं. यामध्ये लग्जरी आणि स्पोर्ट्स कारचा समावेश असतो. हे इंजिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते.
advertisement
7/7
सामान्य पेट्रोल रोज वापर होणाऱ्या कंप्रेशनच्या गाड्यांसाठी पुरेसं असतं. एकूणच प्रीमियम पेट्रोल चांगले परफॉर्मेंस आणि अनेक बाबतीत चांगलं मायलेज देतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
प्रीमियम फ्यूल एवढं महाग का असतं? नॉर्मल पेट्रोलपेक्षा त्यात काय वेगळं? घ्या जाणून