TRENDING:

Property Rules : नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व मालमत्तेवर बायकोचा अधिकार असतो का? सासऱ्यांच्या नावावरच्या संपतीचं काय? 99 टक्के महिलांना अपूर्ण माहिती

Last Updated:
Property rights of widow in India : अनेक महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती नसते, ज्यामुळे कठीण काळात त्यांना आर्थिक संघर्षाचा सामना करावा लागतो. म्हणूनच, 'हिंदू वारसा कायदा' (Hindu Succession Act) पतीच्या मालमत्तेबाबत नक्की काय सांगतो, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
advertisement
1/11
नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्तेवर बायकोचा अधिकार असतो का?
कुटुंब म्हटलं की प्रेम, विश्वास आणि सुरक्षा आलीच. पण जेव्हा संपत्तीचा प्रश्न येतो, तेव्हा अनेकदा नात्यात दरी निर्माण होते. आपल्या समाजात आजही एक समज आहे की, पतीच्या निधनानंतर त्याची सर्व मालमत्ता आपोआप पत्नीच्या नावावर होते. मात्र, भारतीय कायद्याच्या चौकटीत हे चित्र पूर्णपणे वेगळे आहे.
advertisement
2/11
अनेक महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची माहिती नसते, ज्यामुळे कठीण काळात त्यांना आर्थिक संघर्षाचा सामना करावा लागतो. म्हणूनच, 'हिंदू वारसा कायदा' (Hindu Succession Act) पतीच्या मालमत्तेबाबत नक्की काय सांगतो, हे आज आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत.
advertisement
3/11
अनेकांना वाटते की पतीच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली मालमत्ता केवळ पत्नीची आहे. पण कायदा सांगतो की, जर पतीने कोणतीही वसीयत (Will) केली नसेल, तर त्याची संपत्ती 'प्रथम श्रेणी वारसदारांमध्ये' (Class I Heirs) समान वाटली जाते.
advertisement
4/11
वाटेकरी कोण? पत्नी, मुले (मुलगा व मुलगी) आणि पतीची आई.उदाहरण: जर पतीच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि त्याची आई असे चार जण असतील, तर संपत्तीचे चार समान भाग होतील. पत्नीला संपूर्ण मालमत्ता न मिळता केवळ 25% हिस्सा मिळेल.
advertisement
5/11
वसीयत असेल तर काय?जर पतीने हयात असताना स्पष्टपणे वसीयत लिहून ठेवली असेल, तर कायद्यानुसार त्याचेच पालन केले जाते. पतीने जर आपली मालमत्ता पत्नीव्यतिरिक्त दुसऱ्या कोणाच्या नावे केली असेल, तर पत्नी त्यावर सहज हक्क सांगू शकत नाही. मात्र, जर ही वसीयत फसवणूक करून किंवा दबावाखाली लिहून घेतल्याचे सिद्ध झाले, तरच पत्नी त्याला न्यायालयात आव्हान देऊ शकते.
advertisement
6/11
सासरच्या मालमत्तेवर सुनेचा हक्क असतो का?सासू-सासर्‍यांच्या मालमत्तेबाबत सुनेचे अधिकार परिस्थितीवर अवलंबून असतात:सासू-सासरे हयात असेपर्यंत सून त्यांच्या संपत्तीत वाटा मागू शकत नाही.सासरच्या निधनानंतर ती संपत्ती थेट त्यांच्या मुलाला (पतीला) मिळते. जर पतीचा मृत्यू सासू-सासर्‍यांच्या आधी झाला असेल आणि त्यानंतर सासरचेही निधन झाले, तरच सून त्यांच्या संपत्तीत हक्काचा दावा करू शकते (जर सासरच्यांनी कोणाच्याही नावे वसीयत केली नसेल तर).
advertisement
7/11
छत्तीसगड उच्च न्यायालयाने अलीकडेच दिलेल्या एका निकालानुसार, पतीच्या निधनानंतर जर पत्नी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यास असमर्थ असेल, तर ती सासरच्यांकडून पोटगीची (Maintenance) मागणी करू शकते.
advertisement
8/11
घटस्फोट आणि मुलांचे अधिकारघटस्फोटानंतर पती-पत्नीमधील कायदेशीर नाते संपुष्टात येते. अशा वेळी पत्नी पतीच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही, ती केवळ स्वतःसाठी पोटगी मागू शकते. पण लक्षात ठेवा, आई-वडिलांचा घटस्फोट झाला तरी मुलांचा वडिलांच्या संपत्तीवरील हक्क कधीही संपत नाही. जर एखादी मालमत्ता पती-पत्नीने संयुक्तपणे (Joint Property) खरेदी केली असेल, तर त्याचे समान वाटप केले जाते.
advertisement
9/11
मुलगा आणि मुलगी: आता कोणताही भेदभाव नाही2005 च्या महत्त्वपूर्ण दुरुस्तीनंतर, वडिलांच्या संपत्तीत मुलींना मुलांइतकाच समान अधिकार देण्यात आला आहे. मुलगी विवाहित असो वा अविवाहित, वडिलांच्या स्वकष्टार्जित आणि पैतृक (Ancestral) दोन्ही प्रकारच्या मालमत्तेत तिला भावाप्रमाणेच समान हिस्सा मिळतो.
advertisement
10/11
संपत्तीचे कायदे गुंतागुंतीचे असू शकतात. संकटाच्या वेळी अफवांवर किंवा शेजाऱ्यांच्या सल्ल्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा एखाद्या तज्ज्ञ वकिलाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले. आपल्या हक्कांची जाणीव असणे हीच खऱ्या अर्थाने आपली सुरक्षा आहे.
advertisement
11/11
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Property Rules : नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या सर्व मालमत्तेवर बायकोचा अधिकार असतो का? सासऱ्यांच्या नावावरच्या संपतीचं काय? 99 टक्के महिलांना अपूर्ण माहिती
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल