TRENDING:

वाहनांतून होणाऱ्या प्रदुषणावर तोडगा, पुणेकर तरुणानं बनवलं एअरफिल्टर, तब्बल 50 लाखांची कमाई

Last Updated:
पुण्यातील मयूर पाटील या तरुणाने प्रदूषणावर तोडगा म्हणून एअर प्युरिफायरच स्टार्ट अप सुरु केले आहे. गाड्यांचा मायलेज वाढवणाऱ्या उपकरणाचा शोध मयूरनं लावला आहे.
advertisement
1/9
वाहनांतून होणाऱ्या प्रदुषणावर तोडगा, पुणेकर तरुणानं बनवलं एअरफिल्टर
आज दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलच्या किंमती ह्या वाढत आहेत. त्यामुळेच प्रत्येकजण वैतागला आहे. पण या वाढणाऱ्या दरांबद्दल सामान्य माणूस म्हणून आपण काहीच करु शकत नाही. याचाच विचार करत पुण्यातील मयूर पाटील या तरुणाने प्रदूषणावर तोडगा म्हणून एअर प्युरिफायरच स्टार्ट अप सुरु केले आहे.
advertisement
2/9
गाड्यांचा मायलेज वाढवणाऱ्या उपकरणाचा शोध मयूरनं लावला असून त्यानं स्मॉल स्प्रेक कॉन्स्पेट नावाची कंपनी सुरु केली आहे. त्यामध्ये एअरफिल्टर तयार केला असून त्याने गाडीचा एव्हरेज साधारण 20 किलो मिटरने वाढतो. सोबतच गाडीमधून होणारं प्रदूषणही 40 टक्क्यांनी कमी होतं, असा त्यांचा दावा आहे.
advertisement
3/9
मयूर पाटील याने याबद्दल माहिती देताना सांगितले की, 2008 मध्ये इंजिनिअरिंग करण्यासाठी मी पुण्यात आलो होतो आणि इंजिनिअरिंग करत असताना माझ्या गाडीचं एव्हरेज वाढावं म्हणून अनेक प्रयोग केले. मग एक कल्पना आली की गाडीचा एव्हरेज कसं वाढवलं जाईल यासाठी रिसर्च सुरु केला. मोटर सायकलचे बरेच पार्ट बदले परंतु त्याचा तसा काही फायदा झाला नाही.
advertisement
4/9
बाईकचे मायलेज 25 किमी प्रति लीटर असते ते ही प्रणाली वापरल्यानंतर 39 किमी प्रति लीटर होते. यामुळे 40 टक्के कार्बन एमिशन कमी होते, असं मयूर पाटील याने सांगितले.
advertisement
5/9
1970 मध्ये काही संशोधकांनी हे सिद्ध केले होते की वेगळ्या प्रकारचा एअर फिल्टर वापरलं तर त्याने गाडीची इफिशियशी वाढवता येईल. मग या वर काही रिसर्च कारायला 2012 मध्ये सुरुवात केली.
advertisement
6/9
2015 मध्ये एक स्टार्टअप कॉम्पिडिशन होती. त्यामध्ये सहभाग घेऊन चित्र काढून कशा पद्धतीने तो एअर फिल्टर काम करेल याबदल माहिती सांगितली. तिथे पहिला नंबर आला तेव्हा 5 लाख रुपये बक्षीस मिळाले.
advertisement
7/9
त्यानंतर 2017 मध्ये केसआरडीसीमध्ये पेड पायलट करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्यांच्या 10 बसमध्ये हा एअर फिल्टर बसवला आणि तो टेस्ट केला दीड वर्षाच्या पायलटमध्ये त्यांना 17 लाख रुपयेच डिझेल सेव्ह करून दिलं होतं आणि 1.6 मिलियन मॅट्रिक टर्न कार्बन एमीयशन होते थांबवले होते, असं मयूर पाटील याने सांगितले.
advertisement
8/9
हा एअर फिल्टर इतर फिल्टर पेक्षा 5 ते 10 पटीने महाग आहे. हा फिल्टर एक लाख किलोमीटर पर्यंत वापरता येतो. फक्त दहा हजार किलोमीटरला साबणाच्या पाण्यात धुवायचा. अशा पद्धतीने तो वापरू शकता तर साधारण महिन्याला 300 पर्यंत एअर फिल्टर हे बनवले जातात.
advertisement
9/9
तर ट्रक आणि बसमध्ये 6 ते 10 टक्के, कारमध्ये 10 ते 20 टक्के आणि बाईकमध्ये 10 ते 30 टक्के इम्प्रोव्हमेन्ट ही होते. आणि या व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक उलाढाल ही 50 लाख पर्यंत होते, अशी माहिती मयूर पाटील याने दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
वाहनांतून होणाऱ्या प्रदुषणावर तोडगा, पुणेकर तरुणानं बनवलं एअरफिल्टर, तब्बल 50 लाखांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल