TRENDING:

Rolex घड्याळ लाखोंमध्ये का विकले जाते? कंपनीने वापरली अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी, जी 99% लोकांना माहीत नाही

Last Updated:
हे घड्याळ इतके महाग का आहे? यामागे केवळ महागडे स्टील किंवा प्लॅटिनम वापरले जाते हेच कारण नाही, तर कंपनीच्या संस्थापकांनी वापरलेली अशी एक अनोखी 'मार्केटिंग स्ट्रॅटेजी' (Marketing Strategy) आहे, ज्यामुळे आज रोलेक्सला जगात इतकी प्रतिष्ठा मिळाली आहे. चला, या ब्रँडचा 1905 पासूनचा रंजक प्रवास आणि त्याचे रहस्य जाणून घेऊया.
advertisement
1/12
Rolex घड्याळाची लाखोंमध्ये का किंमत? 99% लोकांना माहीत नाही मार्केटिंग स्ट्रॅटेज
घड्याळ (Watch) म्हणजे केवळ वेळ दाखवण्याचे एक साधन नाही, तर अनेक लोकांसाठी ती त्यांची ओळख, त्यामुळे घड्याळाकडे स्टेटस सिंबल म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे बिझनेसमॅन लोक महागडं घड्याळ घालतात. पण तुम्हाला माहितीय का की जगात अशी काही उत्पादने आहेत, ज्यांची किंमत त्यांच्या नावामुळेच लाखोंमध्ये असते आणि त्यापैकी एक आहे, रोलेक्स (Rolex).
advertisement
2/12
रोलेक्सचे घड्याळ खरेदी करण्यासाठी तुम्हाला केवळ ₹4 ते ₹5 लाख रुपये मोजावे लागत नाहीत, तर तुम्हाला अनेकदा 4 ते 5 वर्षांची प्रतीक्षा (Waiting Period) करावी लागते. पण हे घड्याळ इतके महाग का आहे? यामागे केवळ महागडे स्टील किंवा प्लॅटिनम वापरले जाते हेच कारण नाही, तर कंपनीच्या संस्थापकांनी वापरलेली अशी एक अनोखी 'मार्केटिंग स्ट्रॅटेजी' (Marketing Strategy) आहे, ज्यामुळे आज रोलेक्सला जगात इतकी प्रतिष्ठा मिळाली आहे. चला, या ब्रँडचा 1905 पासूनचा रंजक प्रवास आणि त्याचे रहस्य जाणून घेऊया.
advertisement
3/12
रोलेक्सची कहाणी 1905 मध्ये सुरू झाली. हॅन्स विल्सडॉर्फ (Hans Wilsdorf) यांनी अल्फ्रेड डेव्हिस यांच्यासोबत लंडनमध्ये 'विल्सडॉर्फ अँड डेव्हिस' (Wilsdorf and Davis) नावाची कंपनी सुरू केली. सुरुवातीला ते रिस्ट वॉच (मनगटी घड्याळे) बनवून ज्वेलर्सना विकायचे.
advertisement
4/12
त्या काळात, लोक वेळ पाहण्यासाठी मनगटी घड्याळांवर विश्वास ठेवत नव्हते, कारण पॉकेट वॉच (Pocket Watch) जास्त अचूक वेळ दाखवत असत. पण पॉकेट वॉचची अडचण अशी होती की, पाणी लागल्यास किंवा उंचीवर गेल्यावर ते खराब होत असे.
advertisement
5/12
हॅन्स विल्सडॉर्फ यांनी ओळखले की, मनगटी घड्याळ पॉकेट वॉचपेक्षा अधिक सोयीस्कर आहे; फक्त तिची अचूकता वाढवण्याची गरज आहे. अनेक प्रयोग आणि प्रयत्नांनंतर त्यांनी जगात सर्वात अचूक वेळ दाखवणारी रिस्ट वॉच तयार केली.
advertisement
6/12
रिस्ट वॉचमध्ये अचूकता आणल्यानंतर त्यांनी बाजारात स्वतःच्या ब्रँड नावाने उतरण्याचा निर्णय घेतला. पण 'विल्सडॉर्फ अँड डेव्हिस' हे नाव डायलवर खूप मोठे वाटत होते. म्हणून 1908 मध्ये त्यांनी कंपनीचे नाव बदलून छोटे, आकर्षक आणि लक्षात राहणारे नाव ठेवले 'रोलेक्स' (Rolex).
advertisement
7/12
1908 मध्ये त्यांनी आपले ऑफिस स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे हलवले. कंपनी स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक होणे हा त्यांच्या ब्रँड मूल्यासाठी (Brand Value) खूप महत्त्वाचा ठरला. कारण त्या काळात 'स्विस मेड वॉचेस' (Swiss Made Watches) अचूक वेळेसाठी जगभर ओळखल्या जात होत्या.
advertisement
8/12
पाण्याच्या आतही टिकणारे घड्याळरोलेक्सचे ध्येय केवळ वेळ अचूक दाखवणे नव्हते, तर पाणी, धूळ आणि इतर बाह्य घटकांपासून (Environmental Factors) घड्याळाचे संरक्षण करणे हे देखील होते. प्रचंड मेहनत आणि संशोधनानंतर १९२६ मध्ये रोलेक्सने जगातील पहिले वॉटरप्रूफ (Waterproof) घड्याळ तयार केले आणि त्याला नाव दिले 'ऑयस्टर' (Oyster).
advertisement
9/12
जगाला 'विश्वास' देणारी ती मार्केटिंग स्ट्रॅटेजीघड्याळ वॉटरप्रूफ बनले, पण ते सिद्ध कसे करायचे? नुसती जाहिरात (Advertisement) देऊन लोकांना विश्वास बसणार नव्हता. याच क्षणी हॅन्स विल्सडॉर्फ यांनी मार्केटिंगची अशी अनोखी चाल वापरली, जी आजवर फार कमी लोक जाणतात.
advertisement
10/12
त्यांनी वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचा (Sports Events) आधार घेतला. खेळाडूंच्या मनगटावर ते आपले वॉटरप्रूफ घड्याळ बांधून देत असत.
advertisement
11/12
समुद्र आणि पर्वतांवर चाचणी 1927 मध्ये, मर्सिडीज ग्लित्झ (Mercedes Gleitze) नावाच्या महिलेने इंग्लिश खाडी (English Channel) पोहून पार केली. तिच्या हातात रोलेक्स ऑयस्टर घड्याळ होते आणि खाडी पार केल्यानंतरही ते अचूक वेळ दाखवत होते. या घटनेची बातमी जगभर पसरली आणि लोकांना रोलेक्सवर लगेच विश्वास बसला. या 'इव्हेंट मार्केटिंग'मुळे रोलेक्सने स्वतःची एक युनिक 'ब्रँड इमेज' (Unique Brand Image) तयार केली.
advertisement
12/12
रोलेक्सची किंमत लाखोंमध्ये का असते?आज रोलेक्स घड्याळ महाग असण्याची अनेक कारणे आहेत:रोलेक्समध्ये सर्वात महागडे स्टील (904 एल स्टील), तसेच सोने (Gold) आणि प्लॅटिनमचा (Platinum) वापर केला जातो. कलात्मक कारागिरी प्रत्येक घड्याळ बनवण्यासाठी अत्यंत कुशल कारागीर (Craftsmen) आणि तंत्रज्ञान वापरले जाते.रोलेक्सने स्वतःला केवळ घड्याळ नाही, तर यश, प्रतिष्ठा आणि गुणवत्ता यांचे प्रतीक (Symbol of Success) म्हणून स्थापित केले आहे.यामुळेच रोलेक्सची क्रेझ आजही कायम आहे आणि आजही लोक ते खरेदी करण्यासाठी उत्सुक असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
Rolex घड्याळ लाखोंमध्ये का विकले जाते? कंपनीने वापरली अशी मार्केटिंग स्ट्रॅटेजी, जी 99% लोकांना माहीत नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल