नोकरी सोडली अन् घेतला व्यवसायचा निर्णय, तीन महिन्यात दीड लाख कमावले, तरुणानं असं काय केलं?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
या तरुणाने एका नामांकित कंपनीतील नोकरी सोडून त्याने स्वतःचा सोडा विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय सुरू करून तीन महिने झाले असून या तीन महिन्यात त्याने दीड लाख रुपयांची उलाढाल केली आहे.
advertisement
1/7

सोलापूर शहारातील अवंतीनगर येथे संकेत संभाजी सलगर या तरुणाने एका नामांकित कंपनीतील नोकरी सोडून त्याने स्वतःचा सोडा विक्री करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. हा व्यवसाय सुरू करून तीन महिने झाले असून या तीन महिन्यात त्याने दीड लाख रुपयांची उलाढाल केली आहे. या संदर्भात अधिक संकेत सलगर याने लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
2/7
संकेत संभाजी सलगर राहणार अवंतीनगर येथे तरुणाने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करायचा निर्णय घेतला. बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला संकेत हा एका नामांकित कंपनीत कामाला होता.
advertisement
3/7
त्या कंपनीत महिन्याला त्याला 15 हजार रुपये पर्यंत पगार मिळत होता. संकेत याचे बंधू दौंड या ठिकाणी सोडा विक्रीचा व्यवसाय करत होते.
advertisement
4/7
संकेतला त्यांनी सल्ला दिला की, नोकरी सोडून स्वतःचा सोडा विक्री सुरू करावी. संकेतने हो म्हणत दौंड येथील बंधूजवळच तीन वर्ष सोडा बनविण्याचे काम केले. सोडा कसा बनवायचा हे शिकून घेतले.
advertisement
5/7
काम शिकत शिकत त्याने थोडे थोडे भांडवल जमा केले. आणि फेब्रुवारी महिन्यात अवंतीनगर येथे स्वतःचा 80 हजार रुपयात जयश्री कोल्ड्रिंक्स या नावाने व्यवसाय सुरू केला आहे. संकेतने नवीन सुरू केलेल्या व्यवसायातून तीन महिन्यात 1 लाख 50 हजार रुपयांची उलाढाल केली आहे.
advertisement
6/7
संकेत यांच्या जयश्री कोल्ड्रिंक्स सेंटर येथे जिरा सोडा, ऑरेंज सोडा, पायनापल सोडा, ग्रीन ॲपल सोडा, जिंजर सोडा 20 रुपये प्रति ग्लास मिळतो.
advertisement
7/7
नोकरी करत असलेल्या तरुणांनी हळूहळू भांडवल जमा करून स्वतःचा लहान का होईना स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. आज नाही तर उद्या सुरू केलेला व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल आणि त्यातून नोकरीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, असा सल्ला संकेत सलगर याने दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
नोकरी सोडली अन् घेतला व्यवसायचा निर्णय, तीन महिन्यात दीड लाख कमावले, तरुणानं असं काय केलं?