TRENDING:

कर्ज काढा अन् कोर्सची फी भरा! ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंचा रॉकेट स्कॅम; उकळले 601 कोटी, Inside Story

Last Updated:
Avdhut Sathe: शेअर बाजारातून झटपट श्रीमंत होण्याची स्वप्ने विकणाऱ्या अवधूत साठे यांचा मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. सेबीच्या तपासात त्यांनी शिक्षणाच्या नावाखाली बेकायदेशीर स्टॉक टिप्स विकून 3 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांकडून तब्बल 601 कोटी रुपये उकळल्याचे समोर आलं आहे.
advertisement
1/12
ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंचा रॉकेट स्कॅम; उकळले 601 कोटी, Inside Story
कोट्यवधींचा नफा कमावल्याचे दावे करणाऱ्या फिनफ्लूएंसर अवधूत साठे यांची पोलखोल अखेर सेबी (SEBI)ने उघडकीस आणली. तपासात समोर आले की साठे यांनी ‘शिक्षण’ देण्याच्या नावाखाली प्रत्यक्षात बिननोंदणीकृत स्टॉक टिप्स विक्री केली आणि लाखो गुंतवणूकदारांकडून कोर्स फी म्हणून तब्बल 601 कोटी रुपये घेतले.
advertisement
2/12
त्यांच्यावर गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना कर्ज काढून कोर्स खरेदी करण्यास प्रवृत्त केल्याचे गंभीर आरोपही सिद्ध झाले. सेबीने साठे यांना बाजारातून तातडीने बंदी घातली असून 546 कोटींची बेकायदेशीर कमाई जप्त करण्याचा आदेश दिला आहे. एकेकाळी स्वत:ला ‘ट्रेडिंग गुरु’ म्हणवून घेणाऱ्या व्यक्तीचे साम्राज्य एका आदेशात जमीनदोस्त झाले.
advertisement
3/12
शेअर बाजारातून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना अनेकदा वाटते की मार्केट हे जलद पैसा मिळवण्याचे साधन आहे. पण वास्तवात बहुतेक लोकांना तोटा सहन करावा लागतो. हीच इच्छा आणि गोंधळ हाच अवधूत साठे यांच्या व्यवसायाचा पाया ठरला. स्वत:च्या इंजिनिअरिंग पदवीवर आणि परदेशातील चांगल्या नोकरीवर पाणी सोडून त्यांनी शेअर मार्केटच्या वेगवान जगात पाऊल ठेवले. काही कमावले, काही गमावले आणि मग त्यांच्या डोक्यात आला एक नवा ‘बिझनेस आयडिया’ ट्रेडिंग शिकवण्याचा!
advertisement
4/12
साठे यांनी अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी (ASTA) ची स्थापना करताच ‘फायनान्शियल फ्रीडम’ विकण्याचा मोठा बाजार उघडला. आर्थिक स्वातंत्र्याचे सुंदर स्वप्न दाखवत त्यांनी हजारोंना कोर्सेसची ऑफर दिली. कोर्सची फी 6,000 पासून थेट 1,70,000 पर्यंत!
advertisement
5/12
एवढ्या महागड्या प्रशिक्षणाला त्यांनी ‘इव्हेंट’चा ग्लॅमर दिला. मोठे हॉल, संगीत, जोरदार भाषणं, ‘मी तुम्हाला श्रीमंत करीन’ अशा घोषणा, आणि लोकांचे टाळ्यांचा गडगडाट. दोन-तीन दिवसांत ‘प्रोफेशनल ट्रेडर’ बनवण्याचा दावा त्यांनी केला आणि लाखो लोक या स्वप्नात अडकत गेले. बेरोजगार युवक, निवृत्त व्यक्ती, गृहिणी, सर्वच.
advertisement
6/12
खरी परिस्थिती समोर आली ती तेव्हा, जेव्हा सेबीने त्यांच्या व्यवसायाची चौकशी सुरू केली. तपासात धक्कादायक सत्य उघड झाले.
advertisement
7/12
शिक्षण नाही, तर बेकायदेशीर 'स्टॉक टिप्स' विक्री: साठे प्रशिक्षणादरम्यान थेट लाईव्ह मार्केटमध्ये खरेदी-विक्रीची टिप्स, टार्गेट, स्टॉप लॉस देत होते. ही सर्व कामे फक्त SEBI-नोंदणीकृत इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरालाच करता येतात. साठे यांच्याकडे अशी नोंदणी नव्हती.
advertisement
8/12
फक्त नफा दाखवला, तोटा लपवला: त्यांनी स्वतःचे यशस्वी ट्रेड्स मोठ्या आवाजात दाखवले, पण बहुतेक छोटे गुंतवणूकदार त्यांच्याकडून शिकल्यानंतर मोठ्या तोट्यात गेले. सेबीने यावर स्पष्ट केले की 90% पेक्षा अधिक रिटेल ट्रेडर्स तोटा सहन करतात.
advertisement
9/12
कर्ज घेण्यासाठी दबाव: काही लोकांना त्यांनी कर्ज काढा, दागिने गहाण ठेवा आणि कोर्सची फी भरा असेही सांगितले. आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांना आणखी धोक्यात ढकलले.
advertisement
10/12
3.37 लाख लोकांकडून 601 कोटींची कमाई: एस्टाने लाखो लोकांकडून कोर्सेसच्या नावाखाली प्रचंड रक्कम कमावली. ज्यातील बहुतेक कमाई बेकायदेशीर सल्ल्यांवर आधारित होती.
advertisement
11/12
या सर्व पुराव्यांनंतर SEBI ने कडक कारवाई केली. अवधूत साठे, त्यांची पत्नी गौरी साठे आणि ASTA यांना बाजारातील सर्व प्रकारच्या गुंतवणूक/ट्रेडिंग/अॅडव्हायजरी गतिविधींवर तात्काळ बंदी. 546 कोटी रुपये जप्त करण्याचा आदेश, भारतातील फिनफ्लूएंसरवर घेतलेल्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक.
advertisement
12/12
सर्व बँक आणि डीमॅट खाते फ्रीझ: आता साठे यांचे भविष्य धूसर आहे. सेबीने 21 दिवसांच्या आत कारणे सांगण्यास सांगितले आहे. अन्यथा अंतिम आदेशात त्यांना कायमस्वरूपी बाजारातून बाहेर केले जाऊ शकते, प्रचंड दंड लावला जाऊ शकतो आणि जप्त केलेले पैसे परत करावे लागू शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनी/
कर्ज काढा अन् कोर्सची फी भरा! ट्रेडिंग गुरु अवधूत साठेंचा रॉकेट स्कॅम; उकळले 601 कोटी, Inside Story
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल